शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

आता मोहाच्या फुलांपासून लाडू, कुपोषणावर उत्तम पर्याय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 04:03 IST

ग्रामीण भागात पूर्वी सर्रास बनत असलेल्या मोहफुलांपासून बनवलेल्या गावठी दारूला विशेष महत्त्व होते. मात्र, मुरबाड तालुक्यातील आदिवासी महिलांनी दारूबंदी करून याच फुलांचे जास्त आहारमूल्ये असलेले लाडू बनवण्याचा व्यवसाय सुरू केला.

मुरबाड   - ग्रामीण भागात पूर्वी सर्रास बनत असलेल्या मोहफुलांपासून बनवलेल्या गावठी दारूला विशेष महत्त्व होते. मात्र, मुरबाड तालुक्यातील आदिवासी महिलांनी दारूबंदी करून याच फुलांचे जास्त आहारमूल्ये असलेले लाडू बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. याने आदिवासी महिलांच्या व्यवसायात आणि जीवनात नवक्र ांती घडली आहे. महत्त्वाचे म्हणजे, या लाडवांमुळे कुपोषणावरील एक उत्तम पर्याय समोर आला आहे.महाराष्टÑातील बहुतांश जंगलात मोहाची झाडे आढळतात. मोहाला ग्रामीण भागात कल्पवृक्ष समजले जाते. मोहाचे लाकूड हे इमारतीचे काम तसेच फर्निचरसाठी उपयोगी असून फुले आणि फळे देखील उपयोगी आहेत. कच्च्या फळांची भाजी केली जाते तर फळांमधील बिया म्हणजे मोहटीपासून खाद्यतेल बनते. मात्र, फुलांचा सर्रास वापर हा ग्रामीण भागात गावठी दारू बनविण्यासाठी होत होता. या मोहाच्या गावठी दारूला मोठी पसंती मिळते. मात्र, या दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत असल्याने आदिवासी महिलांनी दारूबंदी करण्यात आली.मुरबाड तालुक्यातील आदिवासी महिला या ‘वननिकेतन संस्थे’च्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याच्या अभ्यास दौऱ्यावर गेल्या होत्या. तिथे गेल्यावर त्यांनी मोहफुलांपासून बनवलेले अनेक खाद्यपदार्थ पाहिले. यावेळी मोहफुलांची आहारमूल्ये तपासून त्यांची माहिती घेतली असता ते दूध आणि मनुकांपेक्षाही जास्त प्रमाणात असल्याचे आढळून आले. त्यामुळे आदिवासी आणि ग्रामीण भागातील कुपोषणावर एक उत्तम पर्याय निघू शकतो. मोहफुलांमध्ये प्रथिने, कॅल्शिअम, खनिजे, तंतूमय पदार्थ, ऊर्जा आणि ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागात आढळणाºया कुपोषण मुक्तीसाठी ही फुले वरदान ठरतील असा विश्वासही आदिवासी महिलांनी व्यक्त केला आहे.ग्रामीण भागात मोहाची झाडे मुबलक असून या झाडांना मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान फुले येतात. ही फुले झाडावरून गळून पडतात. ती गोळा करून सुकविली जातात. या फुलांमध्ये काही घटक मिसळून त्याचे लाडू तयार करतात. हे लाडू वनविभागाने माळशेज घाट रस्त्यावरील नाणे घाट प्रवेशद्वाराजवळील विक्री केंद्रावर ठेवले असून पर्यटकांच्या पसंतीला उतरत आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी मोहफुलांपासून लाडू, जॅम, सरबत, पुरणपोळी यांसारखे पदार्थ बनवतात. मुरबाडमधील आदिवासी महिलांनी देखील त्याची माहिती घेऊन मोहफुलांचे लाडू बनविण्याचा गृहउद्योग सुरू केला आहे. या लाडवांना चांगली पसंती मिळते आहे.- अ‍ॅड. इंदवी तुळपुळे,अध्यक्ष, वननिकेतन संस्था, श्रमिक मुक्ती संघटनामोहाच्या फुलांपासून लाडू बनवण्यामुळे होतकरू तरुणांना तसेच महिलांना रोजगाराचे साधन निर्माण होते आहे. यासाठी मोहाच्या झाडांचे संगोपन होणे गरजेचे आहे. त्यांना स्वयंरोजगारासाठी नागपूर गोंदिया येथे प्रशिक्षण देण्यात आले असून भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून कर्ज पुरवठा करण्यात येत आहे.- संजय चेन्ने, वनक्षेत्र अधिकारी, टोकावडे 

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य