सराईत चोरटयाला ठाण्यातून अटक: मोबाईल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 21:55 IST2018-11-26T21:46:56+5:302018-11-26T21:55:05+5:30
मानपाडा भागातील एका घराचे कुलूप तोडून घरातील रोकड आणि मोबाईल चोरणाऱ्या रवि मल्ला या चोरटयाला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे.

कापूरबावडी पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मोबाईल चोरी करणा-या रवि मल्ला या सराईत चोरटयाला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून एक मोबाईल हस्तगत केला असून त्याच्याकडून आणखीही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मानपाडा येथील इंदूबाई चाळीतील निलेश चव्हाण यांच्या घरामध्ये ५ ते ६ नोव्हेंबर दरम्यान रवि मल्ला याने शिरकाव करुन मोबाईलसह ३० हजारांचा ऐवज चोरला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ यांच्या पथकाने खब-यांच्या आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रविला २३ नाव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.