शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

शहरातील रुग्णालयांना पुन्हा नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 00:10 IST

३४७ रुग्णालयांना अग्निसुरक्षेच्या नियमांबाबत पालिकेने बजावले

ठाणे  :  मुंब्य्रातील प्राईम क्रिटिकेअर हॉस्पिटलला लागलेल्या आगीनंतर जाग आलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील ३४७ रुग्णांलयांना पुन्हा नोटिसा बजावून अग्निसुरक्षा सक्षम करण्यास सांगितले आहे. या रुग्णालयांपैकी ३४ रुग्णालये बंद असून २८२ रुग्णालयांना हा अहवाल आता सादर करावा लागणार आहे. यापूर्वी ठाण्यातील ६५ रुग्णालयांमध्ये सक्षम अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. त्यामुळे त्यांनादेखील पुढील सात दिवसांची मुदत दिल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. त्यानंतर कशाप्रकारे कारवाई करता येऊ शकते, याचा अभ्यासदेखील अग्निशमन विभागाने सुरू केला आहे.           

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंब्य्रातील प्राईम क्रिटिकेअर हॉस्पिटलला आग लागली होती. या आगीतून बाहेर काढल्यानंतर चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या तपासणीअंती या रुग्णालयाकडे अग्निशमन दलाचा ना हरकत दाखलाच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आता शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे निश्चित केले आहे. ठाणे शहरात सरकारी तसेच पालिका रुग्णालये व आरोग्य केंद्रांची संख्या ३४ च्या आसपास असून ३४७ खासगी रुग्णालये आहेत. मुंब्रा घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शहरातील सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालयांची अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता हे काम पुन्हा एकदा सुरू झाले आहे. याआधी केलेल्या अशाच प्रकारच्या तपाणीत ठाण्यातील २८२ रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा असल्याचे समोर आले होते. ३४ खासगी रुग्णालये बंद असून ६५ रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणाच नसल्याची बाबही पुढे आली होती. 

कारवाई विचाराधीन नियम धाब्यावर बसवलेल्या ६५ रुग्णालयांना नोटिसा बजावून सात दिवसांत अग्निसुरक्षा यंत्रणा बसविण्याचे आदेश अग्निशमन दलाने याआधीही दिले होते. मात्र, त्याकडे या रुग्णालयांनी दुर्लक्ष केले. मुदतीनंतरही यंत्रणा बसविण्याकडे कानाडोळा करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या रुग्णालयांवर काय कारवाई करता येऊ शकते, याचा विचार पालिकेत सुरू आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका