शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम
5
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
6
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
7
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
8
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये का घालतंय मीठ? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
9
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
10
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लक्झरी इलेक्ट्रिक कार देते ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
11
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
12
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
13
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
14
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
15
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
16
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
17
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
18
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
19
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
20
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती

"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:06 IST

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात बोलताना त्यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्यावरुन एक विधान केलं आहे.  नगरविकास खाते असल्याने पैशांचा काही तुडवडा येणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याने त्याची आता चर्चा सुरु झालीय. तसेच राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्री असताना चालना दिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच करोडो लाडक्या बहि‍णींचा भाऊ ही ओळख मिळाल्याचेही एकनाथ शिंदे म्हणाले. 

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील 'दिवाळी पहाट' कार्यक्रमात बोलताना त्यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून विकासासाठी निधीची कोणतीही अडचण येणार नाही, असे मोठे विधान केले आहे. ठाण्यातील रहेजा गार्डन्स येथे झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले.

"पैशांची चिंता नाही, विकास हाच अजेंडा"

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "जी काही उर्वरित कामे आहेत, ती पूर्ण केली जातील. आपल्याकडे नगरविकास खाते असल्याने पैशांचा काही तुटवडा येणार नाही. विकास प्रकल्पांना जे जे आवश्यक असेल, ते पूर्ण केले जाईल." नगरविकास खात्याच्या माध्यमातून निधीची कमतरता भासू न देण्याचा त्यांचा विश्वास आता चर्चेचा विषय बनला आहे.

माजी मुख्यमंत्री म्हणून कामाचा अभिमान

राज्यात मुख्यमंत्री म्हणून काम करताना केलेल्या कार्याचाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. "राज्यातील अनेक रखडलेल्या प्रकल्पांना आपण चालना दिली. तसेच, कल्याणकारी योजना देखील सुरू केल्या," असे ते म्हणाले. "पदे येतात आणि जातात, त्याची मला चिंता नाही. अडीच वर्षाच्या काळात या राज्यासाठी खूप कामे करू शकलो याचा मला अभिमान आहे. त्या दरम्यान महाराष्ट्र एक नंबर ठेवण्याचे भाग्य मला मिळाले," असेही ते म्हणाले.

'करोडो बहिणींचा भाऊ' ही मोठी ओळख

राजकीय कार्याच्या पलीकडे, कामामुळे मिळालेल्या लोक-ओळखीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. "कामामुळे लाडक्या बहिणींचा भाऊ ही सर्वात मोठी ओळख मला मिळाली," असे भावनिक विधान त्यांनी केले.

पर्यावरणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज

यावेळी त्यांनी वातावरणातील बदलांवरही चिंता व्यक्त केली. मे महिन्यापासून सुरू असलेला पाऊस अजूनही थांबलेला नाही, त्यामुळे पर्यावरण आणि ग्लोबल वॉर्मिंगकडे लक्ष देण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे आवाहन त्यांनी केले. ठाण्यात कोलशेत येथे सेंट्रल पार्क विकसित केल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच, ठाणे पालिका आयुक्तांना मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : No shortage of funds: Shinde assures development in Thane.

Web Summary : Deputy CM Eknath Shinde assured no funding shortage for Thane's development due to his urban development portfolio. He highlighted past achievements as CM and emphasized environmental concerns, urging tree plantation.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेDiwaliदिवाळी २०२५