उल्हासनगर महापालिकेच्या अभ्यास केंद्रात इतर कार्यालय नकोच! मनसेचे रस्त्यावर बसून आगळेवेगळे आंदोलन

By सदानंद नाईक | Updated: February 24, 2026 20:16 IST2026-02-24T20:16:25+5:302026-02-24T20:16:50+5:30

शैक्षणिक अभ्यास केंद्रात महापालिकेचे कोणतेही कार्यालय स्थलांतरित करू नये, अशी भूमिका घेतली. 

no other office in ulhasnagar municipal corporation study center mns protest on the streets | उल्हासनगर महापालिकेच्या अभ्यास केंद्रात इतर कार्यालय नकोच! मनसेचे रस्त्यावर बसून आगळेवेगळे आंदोलन

उल्हासनगर महापालिकेच्या अभ्यास केंद्रात इतर कार्यालय नकोच! मनसेचे रस्त्यावर बसून आगळेवेगळे आंदोलन

सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरातील मुले युपीएससी, एमपीएससी यासह अन्य स्पर्धा परीक्षेत चमकावे म्हणून महापालिकेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिका सुरू केली. अभ्यासिकेत दिव्यांग विभाग हलवून इतर उपक्रम सुरु केल्याच्या निषेधार्थ मनसेने मंगळवारी दुपारी विध्यार्थ्यांसह खाली बसून आंदोलन करून शैक्षणिक अभ्यास केंद्रात महापालिकेचे कोणतेही कार्यालय स्थलांतरित करू नये, अशी भूमिका घेतली. 

उल्हासनगर महापालिका अभ्यासिकेत सुरू केलेली इतर कार्यालये तातडीने हटवावीत, या मागणीसाठी मंगळवारी भर उन्हात मनसे व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला. प्रशासनाचा निषेध करण्यासाठी पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी चक्क रस्त्यावर बसून अभ्यास करत प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलकांनी प्रशासनासमोर केवळ कार्यालय हटवण्याचीच नाही, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी युपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली सर्व संदर्भ पुस्तके अभ्यासिकेत उपलब्ध करून द्यावीट. अशी मागणी करण्यात आली. 

शहरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञांमार्फत मोफत मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी एसएस- सीआयटी आणि सीसीसी सारखे तांत्रिक कोर्सेस मोफत उपलब्ध करून द्यावेत. असीही मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी केले. यासह पिण्याचे स्वच्छ पाणी आणि इतर मूलभूत सोयीसुविधांची तात्काळ पूर्तता करावी. असेही देशमुख म्हणाले.

प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे 

मनसे विध्यार्थी सेना व विध्यार्थ्यांच्या आंदोलनाची तीव्रता पाहून महापालिका प्रशासनाच्या वतीने सहाय्यक आयुक्त अजय साबळे, गणेश शिंपी आणि यशवंत सगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मनसे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा केली. यापुढे या अभ्यास केंद्रात शैक्षणिक उपक्रमांव्यतिरिक्त महापालिकेचे कोणतेही कार्यालय असणार नाही. असे लेखी आश्वासन प्रशासनाच्या वतीने दिले. या आश्वासनानंतर मनसेच्या वतीने आंदोलन मागे घेण्यात आले. 

या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी केले. यावेळी उपशहर अध्यक्ष मुकेश शेठ पलानी, विभागाध्यक्ष अमोल पाटील, अक्षय धोत्रे, कैलास घोरपडे, विकी जिप्सन, नटवर वसिटा, प्रशांत संगाळे, सचिन शिरसाठ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title : उल्हासनगर में मनसे का प्रदर्शन: अध्ययन केंद्र में पालिका कार्यालय का विरोध

Web Summary : मनसे ने उल्हासनगर महानगरपालिका द्वारा अध्ययन केंद्र में कार्यालय खोलने का विरोध किया। छात्रों ने कार्यालय हटाने, बेहतर सुविधाएँ और प्रतियोगी परीक्षाओं के लिए मुफ्त कोचिंग की मांग की। प्रशासन ने आश्वासन दिया कि कोई और कार्यालय नहीं होगा, जिसके बाद विरोध समाप्त हो गया।

Web Title : MNS protests Ulhasnagar Municipal Corporation's office in study center.

Web Summary : MNS protested against Ulhasnagar Municipal Corporation using a study center for offices. Students joined, demanding removal of offices, better facilities, and free coaching for competitive exams. The administration assured no further offices, leading to the protest's end.