शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांना मोकाट सोडणारे ठाण्याचे नऊ पोलिस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 07:09 IST

अचानक केलेल्या तपासणीत धक्कादायक प्रकार आला उघडकीस

ठाणे :ठाणे कारागृहातील सात कैद्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेले होते. त्याठिकाणी ठाणे शहर मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांनी केलेल्या अचानक झाडाझडती घेतली असता दोन कैदी गैहजर असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. या हलगर्जीकरिता मुख्यालयातील पोलिस हवालदार गंगाराम घुले यांच्यासह नऊ पोलिसांवर उपायुक्त बनसोड यांनी निलंबनाची कारवाई केली. कैद्यांकडून मलिदा घेऊन त्यांना कुटुंबासमवेत किंवा गँगच्या सदस्यांसोबत मौजमजा करण्याकरिता सोडल्याचा संशय व्यक्त होत आहे.

कळवा येथील ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सात कैद्यांना तपासणीसाठी ४ ऑगस्ट २०२५ रोजी नेले होते. उपायुक्त बनसोड यांनी अचानक या रुग्णालयात कैद्यांची तसेच बंदोबस्तावरील पोलिस अंमलदारांची झाडाझडती घेण्यात आली. तपासणीमध्ये सात पैकी केवळ पाच कैदी आढळले. उर्वरित दोघे हे एक्स रे तपासणीसाठी  किंवा लघुशंकेसाठी शौचालयात गेल्याची धादांत खोटी उत्तरे बंदोबस्तावरील पोलिसांनी दिली. दोन्ही ठिकाणी हे कैदी आढळले नाही. चौकशीदरम्यान सातही कैद्यांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात याच अंमलदारांनी शासकीय वाहनातून सोडल्याचे उघडकीस आले. कैदी पार्टीच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जी, बेजबाबदारपणा केल्याचा ठपका ठेवत घुले यांच्यासह नऊ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

काय आहेत आरोप?

पोलिस उपायुक्तांच्या झाडाझडीत केवळ पाच न्यायालयीन कैदी आढळले. 

पाचपैकी एकाला बेडी न लावता बाहेर बसून ठेवले होते.

कैद्यांच्या अनुपस्थितीबाबत प्रभारी घुले यांनी  उलटसुलट उत्तरे दिली. 

दोन्ही कैदी क्ष-किरण तपासणी किंवा शौचालयातही नव्हते. 

५ कैद्यांना कारागृहात परत सोडण्याचे आदेश दिल्यानंतर सातही कैदी हे एकत्रित ३:५० च्या सुमारास कारागृहात सोडल्याचे आढळले. 

मौजमजेसाठी हेतूपुरस्सर हातमिळवणी करून वरिष्ठांची दिशाभूल केली. 

टॅग्स :thaneठाणेjailतुरुंगPoliceपोलिस