शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

नवीन पार्किंग धोरणाचा, ठाणे महापालिकेला आधार; वर्षाकाठी मिळणार कोट्यवधींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 9:45 AM

रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व्हावी, वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी, या उद्देशाने ठामपाने आठ वर्षांपूर्वी स्मार्ट पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय घेतला.

 ठाणे : कोरोनामुळे आर्थिक स्थिती नाजूक झाल्याने ठाणे महापालिकेने आता उत्पन्नाचे नवनवे पर्याय निवडण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जुने स्मार्ट पार्किंग धोरण फाइलबंद करून आता नवीन धोरण अमलात आणण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. या धोरणामुळे रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लागणार आहे. वाहतूककोंडी कमी होण्याबरोबर मनपाच्या तिजोरीत वर्षाकाठी कोट्यवधींचा निधी जमा होईल, असा दावा मनपाने केला आहे. नवीन धोरणासाठी मनपाला कोणताही आर्थिक भार सहन करावा लागणार नाही. यासंदर्भातील प्रस्ताव १९ मेच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व्हावी, वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी, या उद्देशाने ठामपाने आठ वर्षांपूर्वी स्मार्ट पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यातून शहरातील १७७ रस्त्यांवर ९,८५५ वाहने उभी करण्याची सुविधा मिळणार होती. रस्त्यांची अ, ब, क आणि ड अशी वर्गवारी करून वाहनांसाठी शुल्क आकारले जाणार होते. मनपाला या योजनेसाठी १८ कोटींचा खर्च करावा लागणार होता. तर कंत्राटदार उत्पन्नातील काही वाटा मनपाला देणार होता. या कामाकरिता १५ वर्षांसाठी निविदा काढली होती. त्यास महासभेनेही मंजुरी दिली होती; परंतु निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर ती रद्द करण्यात आली.

आता पुन्हा नव्याने पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्यासाठी प्रभाग समिती स्तरावर पुन्हा सर्वेक्षण केले आहे. शहरातील नवीन उड्डाणपूल, मेट्रो पूल येथे मूळ योजनेत वाहनतळ होते. ते नव्या सर्वेक्षणानंतर रद्द केले आहेत. तसेच नवीन रस्ते आणि रुंंदीकरण झालेल्या रस्त्यांवर वाहनतळ निर्माण करण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर स्थानिक शहर वाहतूक विभागाच्या मदतीने सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या सर्वेक्षणानुसार मनपाने पार्किंग धोरणाचा नवा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार आता परंपरागत पद्धतीने रस्त्यावर सशुल्क पार्किंग धोरण राबविण्यात येणार आहे. नव्या धोरणात १६८ रस्ते असून, या सर्वच रस्त्यांवर ११ हजार ९३१ वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण केली जाणार आहे. आधीच्या धोरणात ही संख्या कमी होती. यामध्ये ६,४७४ दुचाकी, १,५४६ तीनचाकी, ३,३६० हलकी चारचाकी, ५४८ अवजड चारचाकी वाहनांची पार्किंग येथे होऊ शकणार आहे. त्यानुसार आता हा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेच्या पटलावर ठेवला आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाParkingपार्किंगMONEYपैसा