शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या 1175 रुग्णांची नव्याने वाढ, 27 जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2020 8:15 PM

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे 224 रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत. शहरात 26 हजार 133 कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार 175 रुग्णांची वाढ आज मंगळवारी झाली आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील रुग्ण संंख्या एक लाख 25 हजार 352 झाली आहे. तर 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या आता तीन हजार 577 झाली आहे.        ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे 224 रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत. शहरात 26 हजार 133 कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. तर आज ही पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे आजपर्यंत 844 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर कल्याण - डोंबिवली परिसरात 205 रुग्णांची आज वाढ झाली असून आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 29 हजार 220 रुग्ण बाधीत झाले आहेत. तर मृतांची संख्या 638 झाली आहे. 

         नवी मुंबई महापालिकेत 282 रुग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या 26 हजार 431झाली आहे. तर, मृतांची संख्या 595 वर गेली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात आज दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 28 नवे रुग्ण आढळले आहे. आतापर्यंत मृतांची संख्या 228 तर बाधीत रुग्ण  सात हजार 833 झाले आहेत. 

  भिवंडी महापालिका क्षेत्रात आज फक्त 32 बधीत आढळून आले. तर आज एकाचा ही मृत्यू झाला नाही. आता बाधितांची संख्या चार हजार 219 झाली असून मृतांची संख्या 284 झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये आज 167 रुग्णांची तर, एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या 12 हजार 773 झाली, तर, मृतांची संख्या 422झाली आहे. 

     अंबरनाथमध्ये आज 34 रुग्णांची वाढ तर, दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. आज बाधितांची संख्या चार हजार 993 झाली. तर, मृतांची संख्या 188 वर गेली आहे. बदलापूरमध्ये 56 रुग्णांची आज नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या चार हजार 188 झाली. या शहरात आज दोघांचा मृत्यू झाला आहे . त्यामुळे मृत्यूची संख्या 73 झाली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात 147 रुग्णांची वाढ झाली. आज एक मृत्यू झाला नाही. आता बाधितांची संख्या नऊ हजार 562 आणि मृतांची संख्या  आजपर्यंत 305 आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस