नवा कोरोना व्हेरिएंट, घाबरू नका, पण सावध राहा! आयुष टास्क फोर्सचे डाॅ. उदय कुलकर्णी यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 09:10 AM2023-12-19T09:10:16+5:302023-12-19T09:10:24+5:30

आपण काेराेनाच्या तीन लाटांना तोंड दिले आहे आणि लसीकरणाचे दोन डोस सर्वांना दिले आहेत. आपली सरकारी यंत्रणा, आपले जागरूक नागरिक यांना प्राथमिक खबरदारीचे उपायही माहीत आहेत. 

New Corona variant, don't panic, but be careful! AYUSH Task Force Dr. Advice from Uday Kulkarni | नवा कोरोना व्हेरिएंट, घाबरू नका, पण सावध राहा! आयुष टास्क फोर्सचे डाॅ. उदय कुलकर्णी यांचा सल्ला

नवा कोरोना व्हेरिएंट, घाबरू नका, पण सावध राहा! आयुष टास्क फोर्सचे डाॅ. उदय कुलकर्णी यांचा सल्ला

लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सध्या जग सावरून सण, सुटीचा आनंद घ्यायला सुरुवात करीत असतानाच ‘जेएनवन’ हा ओमायक्रॉनचा एक नवीन व्हेरियंट केरळमध्ये आढळला. तीनशेहून अधिक जणांना आठवडाभरात त्याची तपासणी सकारात्मक आली आहे. राज्य सरकारच्या आयुष टास्क फोर्समध्ये तीन वर्षे काम केल्यावर आज पुन्हा कोरोनाची बातमी दिसते तेव्हा ही धोक्याची घंटा तर नाही ना, असे मत सरकारच्या आयुष टास्क फोर्सचे ठाण्यातील सदस्य डाॅ. उदय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 

आपण काेराेनाच्या तीन लाटांना तोंड दिले आहे आणि लसीकरणाचे दोन डोस सर्वांना दिले आहेत. आपली सरकारी यंत्रणा, आपले जागरूक नागरिक यांना प्राथमिक खबरदारीचे उपायही माहीत आहेत. 

आज तरी आपल्याकडे आयुर्वेदातील काढे, चल प्रवास सारखी रसायने आणि दिनचर्येतील बदल, जसे वारंवार वाफ घेणे, गुळण्या करणे, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि हलके अन्न घेणे यांचा प्रभावी उपयोग करून प्रतिकार करता येतो हे वेळोवेळी आपण बघितलेच आहे. नाक गळणे, घसा खवखवणे, चव जाणे, वास येणे बंद होणे, ताप येणे, डोके दुखणे, डोळ्यांची चुरचुर अशी लक्षणे केवळ कोरोनाची नसून, सामान्य फ्लूचीही असू शकतात, असे डाॅ. कुलकर्णी यांनी सांगितले.

‘ती’ परिस्थिती येणार नाही
काेविडच्या पहिल्या लाटेत ज्या प्रकारे परिस्थती उद्भवली हाेती तशी आता उद्भवणार नाही. केरळच्या घटनेवरून जरी घंटा वाजवली तरी घाबरून पुन्हा लॉकडाऊन, पुन्हा सक्तीची जमावबंदी किंवा वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू होईल, असे नसून योग्य खबरदारी घेऊन समाजात वावरणे, वैयक्तिक काळजी घेणे आणि आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला अशा कोणत्याही आजाराला बळी पडू न देणे सहज शक्य आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, सावध राहा, काळजी घ्या, असे  डाॅ. कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: New Corona variant, don't panic, but be careful! AYUSH Task Force Dr. Advice from Uday Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.