शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नेपाळमधील विटी - दांडूच्या जागतीक स्पर्धेत आदिवासी विद्यार्थी - विद्यार्थीनींना दोन सुवर्ण पदक

By सुरेश लोखंडे | Published: January 04, 2019 3:16 PM

काठमांडू येथे जागतिक टिक टॉक (विटी-दांडू ) स्पर्धा १ ते २ जानेवारी दरम्यान पार पडली. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, जर्मनी, अफगाणिस्तान, कोरिया या आठ देशांतील विटी - दांडू खेळाडूंनी सहभाग घेतला. भारतीय संघाकडून खेळणाºया पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कोसबाड येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयातील विद्यार्थी पाच विद्यार्थी आणि दोन विद्यार्थीनींनी या दोन्ही संघांनी पुरूष व महिला गटातील दोन सुवर्ण पदके पटकवून जागतीक नावलौकीक प्राप्त केला, असे या कोसबाड येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयाचे प्रशिक्षक विवेक कुवरा यांनी लोकमतला सांगितले.

ठळक मुद्देकाठमांडू येथे जागतिक टिक टॉक (विटी-दांडू ) स्पर्धा १ ते २ जानेवारी दरम्यान पार पडली भारतासह पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, जर्मनी, अफगाणिस्तान, कोरिया या आठ देशांतील विटी - दांडू खेळाडूंनी सहभाग घेतला कोसबाड येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयातील विद्यार्थी पाच विद्यार्थी आणि दोन विद्यार्थीनींनी या दोन्ही संघांनी पुरूष व महिला गटातील दोन सुवर्ण पदके

सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कुबेराची संपत्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी कुटुंबातीलखेळाडू होतकरून विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य होणे अपेक्षित आहे. पण त्यापासून वंचित असूनही खेळाडू वृत्ती जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी कंपनीत काम करीत पैसे मिळवलेले. त्यातून नेपाळच्या कांटमांडू येथील स्पर्धेतेचे शुल्क भरणा-या पालघर जिल्ह्यातील या आदिवासी विद्यार्थी - विद्यार्थीनींनी जागतीक विटी दांडू (टिक टॉक) स्पर्धेत दोन्ही गटात दोन सुवर्ण पदक पटकून जागतीक नावलौकीक मिळवला आहे.काठमांडू येथे जागतिक टिक टॉक (विटी-दांडू ) स्पर्धा १ ते २ जानेवारी दरम्यान पार पडली. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, जर्मनी, अफगाणिस्तान, कोरिया या आठ देशांतील विटी - दांडू खेळाडूंनी सहभाग घेतला. भारतीय संघाकडून खेळणा-या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कोसबाड येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयातील विद्यार्थी पाच विद्यार्थी आणि दोन विद्यार्थीनींनी या दोन्ही संघांनी पुरूष व महिला गटातील दोन सुवर्ण पदके पटकवून जागतीक नावलौकीक प्राप्त केला, असे या कोसबाड येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयाचे प्रशिक्षक विवेक कुवरा यांनी लोकमतला सांगितले.या विजेत्या पुरु ष संघाने जर्मनीला अंतिम सामन्यात पराभूत करून सुवर्ण पदक पटकावले. तर महिलांनी नेपाळच्या संघाला पराभूत करून सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. ग्रामीण इंडियाच्या भारतीय संघाकडून खेळणाºया पुरूष गटातील या पाच विजेत्यांमध्ये उपकर्णधार मेहुल नांगरे (डहाणू), चिनेश महाले (तलासरी), अतुल महाले(तलासरी), नित्यानंद तुंबडा (वाडा) आणि अजय नाट्या (तलासरी) यांचा समावेश आहे. तर महिला संघतील विजेत्यांमध्ये कीर्ती भरसट (विक्र मगड), कुसुम चौधरी (डहाणू) या विद्यार्थीनींचा समावेश आहे. या आदिवासी स्पर्धकांना प्रशिक्षक डहाणू येथील विवेक कुवरा विजय गुहे यांचे सखोल मार्गदर्शन लाभले. पालघर जिल्हा विटी दांडू असोसिएशनकडून या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून त्यांचे स्वागताची तयारी देखील सुरू झाल्याचे आदिवासी कार्यकर्ते गुरूनाथ सहारे यांनी सांगितले. पालघर जिल्हा आदिवासी समाजाकडून हार्दिक अभिनंदनविजेत्या खेडूंप्रमाणेच वाडा तालुक्यातील इंदगाव येथील नित्यानंद तुंबडा याचे वडील दगावलेले आहे. आई शेत मजुरी करीत आहे. तर तो स्वत: कंपनीत काम करून पदवीचे शिक्षण घेत आहे. तरी देखील त्यांनी स्पर्धेसाठी सुमारे १७ हजार रूपयांचा खर्च स्वकष्ठाने प्राप्त केला आहे. त्याच्या प्रमाणेच सर्वच खेळाडू विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. आता जर्मनीमध्ये या टिक टॉक स्पर्धेचे सामने होणार आहेत. त्यासाठी या विद्यार्थ्यांना जावे लागणार आहे. या प्रमाणे जागतीक पातळी विटी - दांडूचे सामने रंगल्यानंतर हा खेळ आॅलंम्पीकच्या खेळांमध्ये समाविष्ठ होईल आणि शाळांमध्ये देखील तो खेळला जाणारअसल्याचे कुवरा यांनी सांगितले. या स्पर्धांसाठी एका विद्यार्थ्यास सुमारे १७ हजार पेक्षा जास्त खर्च आहे. हा खर्च जाणकार धर्मदाय संस्थांसह आदिवासी विकास विभागाकडून करण्याची अपेक्षा सहारे यांच्यासह प्रशिक्षक कुवरा यांनी व्यक्त केली. त्यासाठी ते येथील अपर आयुक्त कार्यालयाच्या आदिवासी विकास विभागास साकडे घालण्याच्या तयारीत आहे. 

टॅग्स :thaneठाणेpalgharपालघरStudentविद्यार्थी