शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या सूचनांकडे पालिकेचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 00:32 IST

रहदारी व वाहतुकीला अडथळा ठरतील, असे रस्ते, गल्ल्या व्यापून बेकायदा मंडप उभारण्यास परवानगी देऊ नये, असे पोलिसांनी महापालिकेस कळवले आहे.

मीरा रोड : रहदारी व वाहतुकीला अडथळा ठरतील, असे रस्ते, गल्ल्या व्यापून बेकायदा मंडप उभारण्यास परवानगी देऊ नये, असे पोलिसांनी महापालिकेस कळवले आहे. परंतु, शहरात मंडप उभारणीची कामे सुरू झाली असताना पालिका डोळेझाक करत असल्याने आधी बेकायदा मंडप उभारू द्यायचा व नंतर धार्मिक मुद्दा पुढे करत कारवाई करायची नाही, असा फंडा अवलंबला जाण्याची शक्यता आहे.परवानगी नसली तरी रस्ते, पदपथांवर सर्रास कमानी उभारल्या जातात. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात रस्त्याच्या एक तृतीयांश भागातच मंडपासाठी परवानगी देण्याचे न्यायालय व सरकारचे आदेश आहेत. परंतु, रस्त्यांवर खड्डे खोदून कमानी व मंडप बांधले जातात. मंडप, कमानी उभारून झाल्या की, मग धार्मिक मुद्दा पुढे करून पालिका संरक्षण देते. बेकायदा मंडप व कमानी उभारणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करत नाही. यामुळे आधीच शहरात वाहतूककोंडी होऊन रहदारीला अडथळा होत असताना मंडप व कमानींमुळे त्यात मोठी भर पडते.अनंत चतुर्दशीला विसर्जनाच्या मार्गावर जागोजागी मोफत खाद्य व पेय पदार्थांचे स्टॉल तसेच राजकीय वा संस्थांचे स्वागतकक्ष बांधले जातात. यामुळे गर्दी होऊन अगदी चेंगराचेंगरी होते. उष्टं-खरकटं, कचरा तसाच टाकला जात असल्याने रस्त्यांचा उकिरडा होतो. पण, या सर्वांना राजकीय आशीर्वाद असल्याने महापालिकाही संरक्षण देते.मोठ्या मूर्ती आणताना वा विसर्जनावेळी अपघात झाले आहेत. सरकारनेही उंच मूर्ती आणणाºया मंडळांना लहान मूर्ती बसवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आदेश दिले असताना पालिकेने तिलांजली दिली आहे.या सर्व महत्त्वाच्या बाबींची गांभीर्याने दखल घेत सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांना पत्र देऊन १० कलमी मुद्यांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. रस्त्यावर व वाहतुकीला अडथळा होईल, अशा ठिकाणी तसेच विसर्जन मार्गावर स्टेज-मंडपाची परवानगी देऊ नये, असे स्पष्ट कळवले आहे.या उपाययोजना कराबेकायदा फेरीवाले, मोकाट जनावरे व उभी केलेली वाहने हटवा. मंडळांना लहान आकाराच्या मूर्ती आणण्याचे आवाहन करा. भार्इंदर पश्चिमेस रेतीबंदर येथे विसर्जनाची सोय करा, जेणेकरून मोठ्या मूर्तींचे विसर्जन तेथे करता येईल आणि गर्दी होणार नाही. खड्डे बुजवा, दिव्यांची दुरुस्ती करा, मार्गाावर अडथळा ठरतील, अशा झाडाच्या फांद्या छाटा, विसर्जन ठिकाणी जीवरक्षक, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल तैनात ठेवावे आदींचा उल्लेख कुलकर्णी यांनी केला आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवMuncipal Corporationनगर पालिकाPoliceपोलिस