शहापूरजवळ मिळाली १८ लाखांची रोकड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 00:51 IST2019-10-03T00:51:17+5:302019-10-03T00:51:37+5:30
शहापूर विधानसभा मतदारसंघातील शिरोळ चेकनाक्यावर लाल रंगाच्या एका कारमधून आचारसंहितेच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने तब्बल १८ लाखांची रोकड बुधवारी दुपारी जप्त केली.

शहापूरजवळ मिळाली १८ लाखांची रोकड
शहापूर : शहापूर विधानसभा मतदारसंघातील शिरोळ चेकनाक्यावर लाल रंगाच्या एका कारमधून आचारसंहितेच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने तब्बल १८ लाखांची रोकड बुधवारी दुपारी जप्त केली.
आचारसंहिता पथकातील अधिकारी अशोक भवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार सिन्नरकडे जात होती. त्यावेळी स्थिर सर्वेक्षण पथक आणि भरारी पथकातील बाजीराव खैरनार, सचिन गंगावणे आदींनी कारची झडती घेतली, तेव्हा कारमध्ये रोकड सापडली. कारमधील दीपक कोच्चीकोडे आणि व्यंकटेश भंडारी यांनी जमीनखरेदीसाठी ही रक्कम घेऊन जात असल्याचे सांगितले. ते दोघेही गोवंडी येथील दत्तनगर येथील रहिवासी आहेत. यासंदर्भात कसारा पोलीस ठाण्यात नोंद करून रक्कम शहापूर उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे. याबाबत, आयकर विभागालादेखील कळविण्यात आले आहे. यात कोणी दोषी आढळून आल्यास निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाईल, असे भवार यांनी सांगितले.