शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

राष्ट्रवादीची जानेवारीत निवडणूकपूर्व तयारीची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:37 PM

प्रदेश नेते, निरीक्षकांची उपस्थिती; शरद पवार फेब्रुवारीत करणार मार्गदर्शन; ‘व्हिजन २०२०’साठी टीम सज्ज

- प्रशांत माने कल्याण : आगामी लोकसभा, विधानसभा आणि केडीएमसीच्या निवडणुका पाहता राष्ट्रवादी काँगे्रसही जोमाने तयारीला लागली आहे. या निवडणूकपूर्व तयारीच्या चाचपणीसाठी जानेवारीत पक्षातर्फे कल्याण लोकसभा मतदारसंघातील चार विधानसभा क्षेत्रांत विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत. यावेळी पक्षाचे प्रदेश नेते, निरीक्षक निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेतील. तर, फेब्रुवारीत पक्षाचे सर्वेसर्वा व राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे कल्याण-डोंबिवलीत उपस्थित राहून बूथ कमिट्या आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.केडीएमसीत अडीच वर्षांची सत्ता उपभोगलेल्या राष्ट्रवादीची २०१५ च्या निवडणुकीत पुरती वाताहत झाली. पक्षाचे केवळ दोन नगरसेवक महापालिकेत निवडून आले. तसेच अंतर्गत गटबाजी सतावत आहे. नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेत याची प्रचिती आली. ही परिस्थिती पुढे कायम राहिली तर निवडणुकांना सामोरे कसे जायचे, असा मोठा प्रश्न निष्ठावंत कार्यकर्त्यांना पडला आहे.लोकसभा, विधानसभा आणि केडीएमसीची निवडणूक पाहता पक्षाने ‘व्हिजन २०२०’ हा कार्यक्रम आधीपासूनच हाती घेतला आहे. त्यात कल्याण-डोंबिवली जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी अशी ३५४ जणांची टिम तयार केली आहे. प्रामुख्याने बूथ कमिट्यांद्वारे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांना भेडसावणाºया समस्यांचा आढावा घेणे, हे त्यामागचे उद्दीष्ट आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात ४०९, कल्याण पूर्वेत ३४५, कल्याण ग्रामीणमध्ये ३८९ आणि डोंबिवली मतदारसंघात ३०३ बूथ स्थापन केले आहेत. सेवादल, वकील, डॉक्टर, कामगार, माहिती तंत्रज्ञान, महिला फ्रंट यासह अन्य विविध सेलच्या माध्यमातून पक्षाचे काम सुरू असताना कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर असो अथवा सहविचार सभा हे देखील ‘व्हिजन २०२०’ कार्यक्रमाचाच एक भाग असल्याचे बोलले जाते आहे.मात्र, आतापर्यंत केलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जानेवारीत विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत. ६ जानेवारीला डोंबिवली, १३ ला कल्याण पश्चिम, २० जानेवारीला कल्याण पूर्व तर २७ जानेवारीला कल्याण ग्रामीणमध्ये हे शिबिर होणार आहे. या शिबिरांना राष्ट्रवादीचे प्रदेश नेत्यांची उपस्थिती असणार आहे. त्याचप्रमाणे निरीक्षक प्रविण खरात, भरत गंगोत्री, सुहास देसाई आणि सुभाष पिसाळ हे देखील निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेणार आहेत. तर, फेब्रुवारीत शरद पवार कल्याण-डोंबिवलीत मार्गदर्शन करणार आहेत.दरम्यान, जानेवारीत होणाºया शिबिरांमध्ये प्रदेश नेते व निरीक्षक पक्षातील गटबाजी आणि नाराजीवर काय भाष्य करतात तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कानपिचक्या देतात का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.आम्ही सज्ज आहोत, हनुमंते यांचा दावाजानेवारीत निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी चारही मतदारसंघांत विशेष शिबिरे होणार आहेत. फेब्रुवारीत आमचे नेते शरद पवार हे कल्याण- डोंबिवलीत मार्गदर्शन करणार आहेत.लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित पार पडल्यातरी आमची तयारी असल्याचा दावा राष्ट्रवादीचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांना ‘लोकमत’शी बोलताना केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkalyanकल्याण