गिरीश महाजन यांच्या छायाचित्रास मीरा रोडमध्ये राष्ट्रवादीचे जोडे मारो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 20:10 IST2017-11-06T20:09:30+5:302017-11-06T20:10:31+5:30

मीरा रोड - दारू विक्रीवाढीसाठी महिलांची नावं दारूला द्या, असं वक्तव्य करणारे भाजपाचे जलसंपदा मंत्री तथा गिरीश महाजन यांच्या छायाचित्रास जोडेमारो आंदोलन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी निषेध केला.

NCP's Jode Maro movement in the photo of Girish Mahajan | गिरीश महाजन यांच्या छायाचित्रास मीरा रोडमध्ये राष्ट्रवादीचे जोडे मारो आंदोलन

गिरीश महाजन यांच्या छायाचित्रास मीरा रोडमध्ये राष्ट्रवादीचे जोडे मारो आंदोलन

मीरा रोड - दारू विक्रीवाढीसाठी महिलांची नावं दारूला द्या, असं वक्तव्य करणारे भाजपाचे जलसंपदा मंत्री तथा गिरीश महाजन यांच्या छायाचित्रास जोडेमारो आंदोलन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी निषेध केला. आज सोमवारी सायंकाळी मीरा रोडच्या शिवार उद्यानाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी जलसंपदा मंत्री महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जोडे मारा आंदोलन केले.

पौर्णिमा काटकर, माजी सुजाता रामराजे, सुनिता साळुंके, पूजा जैतपाल, हेमा पाटील आदी महिला कार्यकर्त्यांसह नगरसेवक प्रकाश दुबोले, अनिल साबळे आंदोलनात सहभागी झाले होते. महाजन यांच्या छायाचित्राला जोडे मारत व घोषणा देत निषेध करण्यात आला. भाजपाची ही खरी संस्कृती असून, दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे आहेत. महाजन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना मंत्रिपदावरून हाकला, अशी मागणी महिलांनी केली.

Web Title: NCP's Jode Maro movement in the photo of Girish Mahajan