नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नवदुर्गाचा जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 10:45 IST2020-10-19T10:44:55+5:302020-10-19T10:45:26+5:30

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्मीळ योगायोगाची सर्वत्र चर्चा आहे.

Navdurga was born on the first day of Navratri | नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नवदुर्गाचा जन्म

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नवदुर्गाचा जन्म

कल्याण : पश्चिमेतील सिंडिकेट परिसरातील खाजगी रुग्णालयात शनिवारी नऊ मुलींचा जन्म झाल्याची घटना घडली. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्मीळ योगायोगाची सर्वत्र चर्चा आहे. जणू काही नऊ  जणींच्या रूपाने नवदुर्गानीच जन्म घेतल्याची भावना व्यक्त होत आहे.

रुग्णालयात शनिवारी ११ महिलांची प्रसूती झाली. यापैकी नऊ  महिलांनी मुलींना जन्म, तर अन्य दोन महिलांनी मुलांना जन्म दिल्याची माहिती डॉ. अश्विन कक्कर यांनी दिली. आमच्या रुग्णालयात एकाच दिवशी ११ प्रसूती होणे, ही तशी नवीन गोष्ट नाही. 

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी नऊ  मुलींचा जन्म होणे, ही नक्कीच वेगळी आणि आनंदाची बाब असल्याचे कक्कर म्हणाले. या नऊ मुलींसह इतर दोन मुलांची आणि त्यांच्या मातांची प्रकृती ठणठणीत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 

 

Web Title: Navdurga was born on the first day of Navratri