राष्ट्रवादी कॉंग्रेसने मारले सुरेश धस यांच्या प्रतिमेला जोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 17:52 IST2019-01-08T17:50:10+5:302019-01-08T17:52:12+5:30

ठाणे - बिहारी महिलांच्या संदर्भात भाजप आमदार सुरेश धस यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. ...

Nationalist Congress Party has added to the image of Suresh Dhas | राष्ट्रवादी कॉंग्रेसने मारले सुरेश धस यांच्या प्रतिमेला जोडे

राष्ट्रवादी कॉंग्रेसने मारले सुरेश धस यांच्या प्रतिमेला जोडे

ठळक मुद्देराष्ट्रवादीचे आंदोलनधस यांच्यावर कारवाई केली मागणी

ठाणे - बिहारी महिलांच्या संदर्भात भाजप आमदार सुरेश धस यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे, हिंदी भाषीक सेलचे अध्यक्ष प्रभाकर सिंह, जिल्हा उपाध्यक्ष संतोष तिवारी नेतृत्वाखाली यांच्या आ. धस यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धस यांच्या प्रतिमेला काळे फासले.
‘‘बिहारचे लोक येतात आणि पेढा देतात. काय झाले, असे त्यांना विचारले तर मुलगा झाला असे सांगतात. कुठे झाला तर तिकडे झाला. ते राहतात इथे आणि त्यांना मुले तिकडे होतात,’’ असे वक्तव्य धस यांनी बीड येथील एका जाहीर सभेत केले आहे. त्यामुळे बिहारी महिलांचा अवमान झाला आहे, अशा आमदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत शहराध्यक्ष परांजपे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आई धस यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
                    यावेळी आनंद परांजपे यांनी, यापूर्वीही भाजपाचे विधान परिषदेतील सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांनीही पंढरपूर येथील प्रचार सभेत लष्करातील जवानांच्या पत्नीबाबत असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता धस यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करु न भाजपची संस्कृती काय आहे, हे दाखवून दिले आहे. हा महाराष्ट्र शिव-शाहू-फुले- आंबेडकरी विचारधारेचा आहे. या महाराष्ट्रामध्ये राहून अशा पद्धतीने आमच्या माय- भिगनींचा अवमान करण्याचे धाडस या लोकांचे होतेच कसे? भाजपची ही संस्कृती आमचा महाराष्ट्र सहन करणार नाही. भाजपने या देशाची संस्कृती बिघडवण्यास सुरु वात केली आहे. त्यांनी आता आपल्या चिंतन बैठकीमध्ये धस यांच्यासारख्या प्रवृत्तींवर चिेंतन करावे, असे सांगून उत्तर भारतीयोंके सन्मानमे राष्ट्रवादी अब मैदानमे, असा नारा दिला.


 

Web Title: Nationalist Congress Party has added to the image of Suresh Dhas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.