राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग : ठाण्यात सफाई कामगारांची दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 06:49 AM2018-02-03T06:49:09+5:302018-02-03T06:49:25+5:30

स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक प्राप्त करण्याची धुरा ज्या सफाई कामगारांच्या खांद्यावर आहे, त्यांना हक्काचे घर, वेतनातील फरक, त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची संधी अशा अनेक गोष्टींची पूर्तता करण्यात ठाणे महापालिका अपयशी ठरली असल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी उघड झाली.

National Safai Karamchari Commission: Cleanliness of the workers in Thane | राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग : ठाण्यात सफाई कामगारांची दैनावस्था

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग : ठाण्यात सफाई कामगारांची दैनावस्था

Next

ठाणे - स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक प्राप्त करण्याची धुरा ज्या सफाई कामगारांच्या खांद्यावर आहे, त्यांना हक्काचे घर, वेतनातील फरक, त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची संधी अशा अनेक गोष्टींची पूर्तता करण्यात ठाणे महापालिका अपयशी ठरली असल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी उघड झाली. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी महापालिका अधिकाºयांना विचारलेल्या अनेक प्रश्नांची धड उत्तरे त्यांना देता आली नाहीत. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अनुपस्थितीबाबत तसेच बैठकीच्या अखेरीस दाखल झालेल्या जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या लेटलतिफीबाबतही त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
राज्यातील सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत शनिवारी प्रधान सचिवांच्या उपस्थितीत होणाºया बैठकीत ठाणे महापालिकेच्या अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली जाईल आणि त्यांच्याकडून कारवाई झाली नाही, तर उच्चाधिकाºयांकडे कारवाईचा आग्रह धरला जाईल, अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर हाथीबेड यांनी दिली. ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाणे महापालिका, पोलीस विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद आदींसह विविध सफाई कामगारांच्या युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणाकरिता असलेल्या निधीपैकी किती उपलब्ध झाला, त्यापैकी किती खर्च झाला, त्याचा विनियोग कसा झाला, अशी माहिती हाथीबेड यांनी पालिका अधिकाºयांना विचारली. परंतु, अशा प्रकारचा निधी मिळत असल्याची माहिती नसल्याचे धक्कादायक उत्तर पालिकेच्या अधिकाºयांनी दिले. केवळ एकमेकांची तोंडे बघण्यातच त्यांनी धन्यता मानली. अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी मागासवर्गीयांच्या निधीचा उल्लेख करत त्याच्या जमाखर्चाची माहिती दिली. परंतु, त्यातील किती निधी दुर्बल घटकांसाठी खर्च झाला, याचे समाधानकारक उत्तर त्यांच्याकडेही नव्हते. उलटपक्षी, हा निधी इतर कामासाठी खर्च झाल्याची बाब यावेळी उघड झाल्याने हाथीबेड यांनी नापसंती व्यक्त केली. सफाई कामगारांसाठी किती समाजभवने उभारली, वाचनालये, अभ्यासिका आदींसह इतर कोणत्या सुविधा पुरवल्या, या प्रश्नाचे उत्तरही नकारार्थी मिळाल्याने पालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी ठेवला. सफाई कर्मचाºयांची नियमित वैद्यकीय तपासणी होत नसल्याचे युनियनच्या पदाधिकाºयांनी हाथीबेड यांच्या निदर्शनास आणले.
सफाई कर्मचाºयांच्या विविध युनियनच्या पदाधिकाºयांनी पालिकेची लक्तरेच वेशीला टांगली. सफाई कामगारांची थकबाकी अद्याप मिळालेली नाही, पीएफचे पैसे दिले जात नाहीत, २१ दिवसांची रजा दिली जात नाही किंवा त्याचे पैसेही दिले जात नाहीत. सामूहिक विमा काढला गेलेला नाही, किमान वेतन कायद्यानुसार पगार दिला जात नाही, लेव्हीचे पैसे दिले जात नाहीत, असे अनेक मुद्दे युनियनच्या पदाधिकाºयांनी उपस्थित केले. त्यावर, स्पष्टीकरण देताना उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी हे आरोप जुने असून वस्तुस्थिती तशी नाही, असा दावा केला. सफाई कर्मचाºयांच्या देण्याबाबत निर्णय घेण्याकरिता सीएची नेमणूक करण्यात आली आहे. कायदेशीर बाबी पूर्ण करून निधी दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. परंतु, दोन वर्षे उलटूनही अभ्यास का होत नाही, असा सवाल हाथीबेड यांनी उपस्थित केला. किती दिवसांत थकबाकी दिली जाईल, याचे उत्तर त्यांनी मागितले. पालिकेच्या अधिकाºयांना ते देता आले नाही.
सफाई कामगारांची पाडलेली घरे अद्याप उभारण्यात आलेली नसल्याकडे युनियनने लक्ष वेधले. त्याचेही समाधानकारक उत्तर पालिकेला देता आले नाही. सफाई कामगारांकरिता किती वास्तू उभारल्या आहेत, त्या कुठे उभारल्या आहेत, याची माहिती देण्यासाठी पालिकेच्या इस्टेट विभागाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता.

जिल्हा परिषदेची त्रेधा, पण पोलीस-रूग्णालय समाधानकारक

जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांचीही हाथीबेड यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना त्रेधातिरपीट उडाली. सफाई कामगारांच्या मुलांकरिता वसतिगृहे आहेत का, मुलांसाठी कोणकोणती व्यवस्था केली आहे, आदी सर्वच प्रश्नांची उत्तरे देण्यास जिल्हा परिषदेचे अधिकारी सपशेल अपयशी ठरले. पोलीस आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संबंधित अधिकाºयांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
प्रोटोकॉलनुसार या बैठकीला ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल व जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. परंतु, हे दोघे गैरहजर राहिल्याबद्दल हाथीबेड यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. बैठक संपण्याच्या पाच ते १० मिनिटांपूर्वी जिल्हाधिकारी कल्याणकर हजर झाले.

Web Title: National Safai Karamchari Commission: Cleanliness of the workers in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.