"सत्तेत घेण्यासाठी आदित्य, उद्धव ठाकरेंचे प्रयत्न, कबरीच्या विषयावर यांना का मिरच्या झोंबल्या?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 13:54 IST2025-03-16T13:54:02+5:302025-03-16T13:54:41+5:30
Naresh Maske And Sanjay Raut : नरेश मस्के यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

"सत्तेत घेण्यासाठी आदित्य, उद्धव ठाकरेंचे प्रयत्न, कबरीच्या विषयावर यांना का मिरच्या झोंबल्या?"
नरेश मस्के यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच औरंगजेब कबरीवर देखील भाष्य केलं आहे. कबरीचा विषय काढला म्हणून यांना का मिरच्या झोंबल्या? असा सवालही विचारला आहे. "संजय राऊत यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे. युतीमध्ये समाविष्ट करावं आणि सत्तेत घ्यावं म्हणून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत... एकीकडे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करत आहेत त्यामुळे ते इनबॅलेन्स झालेले आहेत.पण त्यांना आता कळालंय सत्तेत येणार नाहीत. आम्ही जर टीका करत बसलो तर हे लोक आम्हाला सत्तेत घेतील असं त्यांचं मतं आहे, त्यातून हे सर्व वक्तव्य ते करत आहेत."
"कबरीचा विषय काढला म्हणून यांना का मिरच्या झोंबल्या? यांनी जाहीर करावं की, औरंगजेब दैवत होतं... आमच्या दैवताचं तुम्ही अपमान करत आहे हे त्यांनी जाहीर करावं. आम्ही जाहीरपणे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे आमचे दैवत आहे आणि आमच्या दैवताला ज्यांनी त्रास दिला त्याची निशाणी आम्हाला महाराष्ट्रात नको... महाराष्ट्रामध्ये ज्या इंग्रजांनी मोगलांनी देश गुलामगिरीकडे नेण्याचा प्रयत्न केला. देशावर आक्रमण केलं त्यांच्या स्मृती या देशातून नको हे आम्ही जाहीरपणे सांगतो. यांना मिरच्या का झोंबल्या?"
"एकही मुस्लिम या विरुद्ध बोलत नाही मग यांना मिरच्या का झोंबल्या... बाळासाहेब ठाकरेंची भूमिका हे विसरले.. अयोध्येमध्ये राम मंदिर होतं त्या ठिकाणी कबर होती. जेव्हा कार सेवकांनी तो ढाचा तोडला तेव्हा बाळासाहेबांनी त्यांचा गौरव केला होता. त्यावेळी बाबराचा ढाचा जो तोडला त्याला सुद्धा यांचा विरोध होता का? यांनी जाहीर करावं दुटप्पी भूमिका कशाकरिता?" असा सवाल मस्के यांनी विचारला आहे.
"केवळ मायनॉरिटीजची व्होट बँक आपल्याकडे यावी कारण बाकीची व्होट बँक त्यांच्याकडून गेलेली आहे. त्यांची भूमिका लोकांना लक्षात आली आहे. त्यामुळे लोक यांना मतदान करत नाहीत. एका विशिष्ट समाजाचा मतदान व्हावं याकरिता हे सर्व प्रयत्न आहेत. एकही मुस्लिम म्हणत नाही, औरंगजेब आमचं दैवत आहे मग यांना का मिरच्या झोंबल्या?"
"यावरून स्पष्ट होतंय औरंगजेबाची कबर ही ४०० वर्षांपूर्वीची आहे, ती नष्ट करण्याकरिता संजय राऊतांचा विरोध आहे. याचाच अर्थ बाबरची कबर तोडली, त्या ठिकाणी राम मंदिर उभारलं त्याला देखील संजय राऊत यांचा विरोध होता हे स्पष्ट होतंय... म्हणून त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गेले नाहीत तर विरोध असल्यामुळे गेले नाहीत हे संजय राऊत यांच्या विधानामुळे स्पष्ट झाले. सरकार जे काही काम करत असेल कायदा आणि सुव्यवस्था त्या दृष्टीने ते त्यांचं काम करत आहे" असं नरेश मस्के यांनी म्हटलं आहे.