शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम, शंकराचार्य आणि रामदास स्वामींनंतर राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा करणारी चौथी व्यक्ती - नाना पटोले

By नितीन पंडित | Updated: September 13, 2022 17:07 IST

कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा करणारी चौथी व्यक्ती म्हणजे राहुल गांधी असे नाना पटोले यांनी म्हटले. 

भिवंडी : श्रीराम यांनी त्याकाळी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा केली त्यानंतर शंकराचार्य यांनी पीठ स्थापन करताना व त्यानंतर रामदास स्वामी यांनी सुध्दा कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा केल्यानंतर आता राहुल गांधी हे चौथे व्यक्ती ही पदयात्रा करणारे ठरणार आहेत असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी रात्री भिवंडी येथे केले आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या घरी नाना पटोले रात्री उशिरा गणेश दर्शना करीता आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. 

याप्रसंगी भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष रशीद ताहीर मोमीन, तालुकाध्यक्ष राकेश पाटील, महेश धानके, चेतनसिंग पवार, विजय पाटील, निलेश भोईर यांसह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. सरवली येथील काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या निवासस्थानी संकष्टी चतुर्थी पर्यंत गणेश स्थापना केली असल्याने गणेश दर्शनाकरिता नाना पटोले आले असता दयानंद चोरघे, युवक काँग्रेस सरचिटणीस विरेन चोरघे व कुटुंबीयांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. 

भाजपावर साधला निशाणा खोटे बोलून सत्ता हस्तगत केलेल्या भाजपाकडून देश विकून देशाचा कारभार सुरू आहे. खरं तर देश चालावण सोपे काम नाही, देश चालवणे भाजपाचे काम नसून भाजपा देश बरबाद करायला निघाले आहेत, देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत, देशाचे संविधान, देशाचा तिरंगा धोक्यात आहे. राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा ही सत्ते साठी नसून देशाचे संविधान, तिरंगा सुरक्षित राहिला पाहिजे, देश एकसंघ राहिला पाहिजे या साठी सुरू केली आहे. असे सांगत नाना पटोले यांनी ज्या ठिकाणी राजीव गांधी यांची हत्या झाली त्या ठिकाणाहून यात्रा सुरू करताना मी माझे वडील गमावले पण देश गमवायचा नाही, तिरंगा वाचवायचा आहे या साठी भारत जोडो यात्रा सुरू केली असल्याने त्यास मोठा प्रतिसाद मिळत असल्याने भाजपामध्ये खळबळ उडाली आहे अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली. 

 

टॅग्स :thaneठाणेNana Patoleनाना पटोलेRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा