Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:36 IST2025-06-06T18:35:32+5:302025-06-06T18:36:23+5:30
Thane Ghodbunder Slip Road: मेट्रो लाईन ४ च्या कामामुळे ठाणे ते ठाणे- घोडबंदर स्लिप रोड पुढील दोन दिवस रात्री वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
कापूरबावडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत सुरू असलेल्या मेट्रो लाईन ४ च्या कामामुळे ठाणे- घोडबंदर स्लिप रोड पुढील दोन दिवस रात्री वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी याबाबत वाहतूक सूचना जारी केल्या आहेत. तसेच परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सदर वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, अशी माहिती ठाणे वाहतूक पोलिसांनी दिली.
कापूरबावडी वाहतूक उप विभागाचे हद्दीत मेट्रो ४ चे काम करण्यात येणार असून ठाणेकडून घोडबंदर कडे स्लीपरोड वरून जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून सदर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रवेश बंद व पर्यायी मार्ग. pic.twitter.com/Bh88SlJ17W
— Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@ThaneCityPolice) June 5, 2025
कापुरबावडी वाहतूक उपविभागाचे हद्दीतील नळपाडा पाईपलाईन येथे मेट्रो ४ चे काम करण्यात येणार आहे. हे काम शनिवारी आणि रविवारी रात्री केले जाणार आहे. त्यामुळे ठाणे- घोडबंदर स्लिप रोड शनिवारी रात्री ११ वाजल्यापासून ते रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत आणि त्यानंतर रविवारी रात्री ११ वाजल्यापासून ते सकाळी ६.०० या वेळेत वाहतुकीसाठी बंद असेल, अशी माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.
ठाणे घोडबंदर स्लीप रोडवरुन कापुरबावडी सर्कल मार्गे घोडबंदरचे दिशेने जाणान्या सर्व प्रकारच्या वाहनांना कापुरबावडी सर्कल येथे 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे.
- या मार्गावरून जाणारी सर्व प्रकारची वाहने पुलाखालील कापूरबावडी सर्कल येथून पुढे जातील, नळपाडा सिग्नलवरून उजवीकडे वळून नंदी बाबा चौक, ढोकळी मार्गे इच्छित स्थळी जातील.
- या मार्गावरून जाणारी सर्व प्रकारची वाहने रवी स्टील नाक्यापासून डावीकडे वळून पोखरण रोड क्रमांक २, गांधी चौक येथून उजवीकडे वळून खेवरा सर्कलमार्गे इच्छित स्थळी जातील.
नळपाडयातून बाहेर येऊन तत्वज्ञान विद्यापीठ मार्गे घोडबंदरचे दिशेने जाणान्या सर्व प्रकारच्या वाहनांना नळपाडा पाईप लाईन येथे प्रवेश बंद असेल.
- सदर मार्गावरुन जाणारे सर्व प्रकारची वाहने नळपाडा पाईप लाईन येथून यु-टर्न घेऊन नळपाडा येथून इच्छित स्थळी जातील.