शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या पाचव्या वाढदिवसाला आईने दहा पुस्तके दिली होती - अभिनेत्री स्पृहा जोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:51 IST

लोकमत साहित्य महोत्सवातील पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अभिनेत्री स्पृहा जोशीने उलगडला बालपणीच्या आठवणींचा पेटारा...

ठाणे : माझ्या पाचव्या वाढदिवसाला मला आईने साने गुरुजींच्या ‘गोड गोष्टी’ या पुस्तकांचे दहा भाग भेट दिले होते. माझ्या आठवणीत असलेली पुस्तकांशी निगडित ही पहिली प्रिय आठवण! तिसरीपर्यंत माझी स्वतःची १५० पुस्तके झाली होती. माझ्या पुस्तकांचा खजिना वाढला तसा माझ्या आजीने मला स्वतःची लायब्ररी सुरू कर, अशी सूचना केली होती.

अशा अनेक आठवणींचा पेटारा प्रख्यात अभिनेत्री स्पृहा जोशीने उलगडून दाखवला. निमित्त होते लोकमत साहित्य महोत्सवातील पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे. ठाण्यात कोरम मॉल येथे आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन स्पृहा जोशी यांच्या हस्ते, ठाण्याचे सहपोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, मॅजेस्टिक प्रकाशनाचे ज्येष्ठ प्रकाशक अशोक कोठावळे यांच्या उपस्थितीत  अतिशय उत्साहात संपन्न झाले. 

महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख प्रकाशकांची वेगवेगळी पुस्तके या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. प्रदर्शनात सगळी पुस्तके मराठी आहेत. यावर्षीची लोकमत साहित्य पुरस्काराने सन्मानित होणारी ११ पुस्तके प्रदर्शनात अग्रभागी सजवून ठेवण्यात आली आहे. यावेळी लोकमतच्या वतीने मुंबई लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी आणि उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनी उपस्थितांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले. 

‘आपण वाचत नाही म्हणून आपल्याला लोक पुस्तक वाचत नाहीत असे वाटते. वास्तविक या क्षेत्रात प्रकाशकांची नवी पिढी देखील येत आहे. अनेक पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघत आहेत. लोकमतने सलग चार वर्ष ठाण्यात पुस्तक प्रदर्शन आयोजित करून वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलला आहे’, असे अतुल कुलकर्णी यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतीक्षा बोर्डे यांनी केले. पहिल्याच दिवशी कविवर्य नारायण सुर्वे ग्रंथ दालनात आयोजित पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे प्रदर्शन सोमवार दिनांक २३ मार्चपर्यंत चालू राहणार असून या मेजवानीचा आस्वाद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिस दल हार्ड पॉवर, साहित्य सॉफ्ट पॉवर..!समाज निरोगी करण्याची ताकद साहित्यात असते वाचन संस्कृती जेवढी वाढेल तेवढा समाज निरोगी होईल. जे लोक वर्तमानपत्र, पुस्तक वाचतात त्यांच्या विचारात प्रगल्भता येते. 

समाजाकडे बघण्याची त्यांची दृष्टी बदलते. ते सकारात्मक विचार करू लागतात. सोशल मीडियामुळे समाज भरकटत असला तरी ‘लोकमत’च्या अशा साहित्य महोत्सवांमधून वाचन संस्कृती वाढेल याविषयी मनात शंका नाही, असे सांगून ठाण्याचे सहपोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले, पोलिस दल हे हार्ड पॉवर म्हणून ओळखले जाते साहित्य हे सॉफ्ट पॉवर आहे. 

चांगल्या साहित्याचा परिणाम चांगलाच होत असतो. पोलिस दलातही आम्ही गुन्हा घडल्यानंतर जे केस पेपर तयार करतो, त्याच्या आधारे एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा होते तेव्हा आमचे लेखन केस स्टडी या साहित्य प्रकारात मोडते, असेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले.

आई, आजीने वाचायला सांगितले...इतर मुले दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत विविध खेळ खेळायचे. मी मात्र लायब्ररी लायब्ररी खेळायचे. पुस्तक वाचन आणि संग्रह करण्याची आवड मला लहानपणापासून लागली. त्याचे श्रेय माझी आई आणि आजी यांना आहे. आजीने मला स्वतःची लायब्ररी करण्याची सूचना केली, तेव्हा सगळ्या पुस्तकांना कव्हर घालून पुस्तकांवर नंबर टाकून मी त्याचा कॅटलॉग तयार केला. 

माझे मित्र मैत्रिणी माझ्याकडून पुस्तक घेऊन जाण्यासाठी यायच्या वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तके संग्रह करण्याची आणि त्यासाठी वर्तमानपत्र वाचनाची आवड आजी-आजोबांनी लावली ज्याचा मला आज प्रचंड फायदा झाल्याचे अभिनेत्री स्पृहा जोशी म्हणाल्या. पुस्तक भेटले की जुने मित्र भेटल्यासारखे वाटते माझ्या वाचनाची आवड माझी शाळा बालमोहन विद्यामंदिर आणि पुढे माझ्या रुईया कॉलेजने वाढवली. तुम्हाला ग्रंथपाल देखील चांगला भेटावा लागतो. माझ्या वाचन प्रक्रियेत ग्रंथपालही महत्त्वाचे होते. आठवी ते दहावी या तीन वर्षात मी ५०० पुस्तके वाचली होती. 

त्याची नोंद मला जेव्हा सापडली तेव्हा स्वर्ग दोन बोटे उरला होता, असे म्हणताना वाचनाचा आनंद स्पृहा जोशी यांनी सगळ्यांसमोर व्यक्त केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Spruha Joshi received ten books from her mother on birthday.

Web Summary : Actress Spruha Joshi recalls receiving ten 'God Goshti' books from her mother on her fifth birthday. The Lokmat book exhibition in Thane was inaugurated by her, emphasizing reading culture and book availability.
टॅग्स :Spruha Joshiस्पृहा जोशी