शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

जगात 30 हजारांहून अधिक मुलांवर संगीतोपचार सुरू असून त्यांच्यात सुधारणा होत आहे- डॉ. विनोद इंगळहळीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 19:31 IST

संगीत मुलांच्या मेंदूच्या वाढीमध्ये फरक घडवून आणू शकतो. संगीतामुळे वाचेवर परिणाम करता येतो. संगीतपोचार करून रूग्णाला बरं करता येते. संगीताचा प्रमुख उपचार म्हणून उपयोग होत नसला तरी ते उत्कृष्ट मदतनीस आहे.

 डोंबिवली- संगीत मुलांच्या मेंदूच्या वाढीमध्ये फरक घडवून आणू शकतो. संगीतामुळे वाचेवर परिणाम करता येतो. संगीतपोचार करून रूग्णाला बरं करता येते. संगीताचा प्रमुख उपचार म्हणून उपयोग होत नसला तरी ते उत्कृष्ट मदतनीस आहे. सध्या जगात विशेष आणि विकलांग अशा 30 हजारांहून अधिक मुलांवर संगीतोपचार सुरू आहेत. त्यांच्यामध्ये थोडय़ा सुधारणा होत असल्याचे मत डॉ. विनोद इंगळहळीकर यांनी व्यक्त केले.    ब्राह्मण सभा,डोंबिवली व वैद्यकीय सेवा समिती यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य वसंत व्याख्यानमाला आरोग्यमंत्र या अंतर्गत ‘सूरा मी वंदिले’ चे आयोजन केले होते. यावेळी डॉ. इंगळहळीकर बोलत होते. ब्राह्मण सभा, टिळक रोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीताचा मानवावर परिणाम व संगीतोपचार दृकश्रव्य माध्यमातून दाखविण्यात आला. यावेळी डॉ. उल्हास कोल्हटकर, वर्षा कोल्हटकर आदी मान्यवर उपस्थित होते.     डॉ. इंगळहळीकर म्हणाले, बाळ आईच्या गर्भात चौथ्या महिन्यापासून संगीत ऐकू लागते. संगीत हे शेवटर्पयत मानवासोबत टिकून असते. बाळ आई वडिलांना ओळखण्यापूर्वी, शब्द उच्चरण्यापूर्वी संगीताला दाद देत असतो. उतारवयात ही सांगितिक क्षमता टिकून राहतात. पहिल्या व दुस:या महायुध्दांच्या काळात काही संगीताकरांनी रूग्णालयात जाऊन जखमी सैनिकांना विरंगुळ्य़ासाठी संगीत ऐकवतं असतं. त्यांच्या स्थितीत सुधारणा होत होती. त्यामुळे डॉक्टर्स व नर्सेस यांना मोबादला देऊन संगीताचा नियमित वापर होऊ लागला. भारतीय संगीत हे जगात अत्यंत प्रगल्भ संगीत मानलं जाते. भारतात सुमारे 2000 वर्षापूर्वी राग उपचार आणि नाद उपचार पध्दती विकसित झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :musicसंगीतHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स