अनैतिक संबंधातून लिव्ह इनमधील महिलेचा खून: आरोपीला बिहारमधून अटक

By जितेंद्र कालेकर | Published: November 15, 2023 08:44 PM2023-11-15T20:44:07+5:302023-11-15T20:44:20+5:30

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई: तिसरा आरोपी पसार

Murder of woman in live-in due to immoral relationship: Accused arrested from Bihar | अनैतिक संबंधातून लिव्ह इनमधील महिलेचा खून: आरोपीला बिहारमधून अटक

अनैतिक संबंधातून लिव्ह इनमधील महिलेचा खून: आरोपीला बिहारमधून अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: अनैतिक संबंध ठेवणाऱ्या २२ वर्षीय महिलेचा खून करणाऱ्या नागा हरिनारायण यादव (२८, रा. बिहार) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाच्या शाखेने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी दिली. यामध्ये १६ वर्षीय मुलाचाही समावेश असून तिसऱ्या फरारी आरोपीचाही शोध घेण्यात येत आहे.

यातील २२ वर्षीय एका अनोळखी महिलेचा २५ ऑक्टाेबर राेजी परकरच्या नाडीने गळा आवळून खून केला होता. त्यानंतर तिचा मृतदेह कल्याणच्या हाजीमलंग टेकडीवरुन खाली फेकून दिला होता. या मृतदेहाची माहिती मिळाल्यानंतर हिललाईन पोलिस ठाण्यात २७ ऑक्टाेबर २०२३ रोजी खूनाचा गुन्हा दाखल झाला. यातील महिलेची ओळख पटवून आरोपीचा शोध घेण्याचे आदेश पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. त्यानुसार मालमत्ता गुन्हे शोध, मध्यवर्ती गुन्हे शोध आणि गुन्हे शाखेच्या उल्हासनगर युनिट अशा तीन पथकांमार्फत खूनाचा तपास सुरु हाेता. मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड आणि उपनिरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकाने सीसीटीव्ही तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यातील महिलेच्या मृतदेहाची नावासहित माहिती काढली. यातील आरोपी बिहारमधील बक्सार जिल्हयात पळून गेल्याची बाबही चाैकशीदरम्यान उघड झाली.

त्याच माहितीच्या आधारे नागा यादव याला बक्सार जिल्हयातील अहिरौली गावातून ७ नोव्हेंबर २०२३ रोजी उपनिरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकाने अटक केली. या महिलेचे त्याच भागातील एका १६ वर्षीय तरुणाबरोबर विवाहापूर्वीच प्रेमसंबंध होते. ती दुसऱ्या जातीची असल्यामुळे दाेघांचे हे संबंध मुलाच्या कुटूंबियांनी मान्य केले नव्हते. मात्र, तरीही या मुलाने तिच्या लग्नानंतर आठ दिवसांनी तिला बिहारमधून कल्याणमध्ये पळवून आणली. इकडे हे दाेघे लिव्ह इन मध्ये वास्तव्यास असतांना तिचे पुन्हा अन्य एकाशी अनैतिक संबंध असल्याचा या मुलाला संशय होता. याच कारणाने त्याने त्याचे वडिल लोटनसिंह यादव तसेच लोटन यांचे मित्र नागा यांच्या मदतीने तिचा कल्याणमध्ये खून केला. खूनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह हाजीमलंग गडावरुन फेकून दिला. पोलिसांनी यातील आरोपी नागाला १० नोव्हेंबर रोजी अटक केली. त्यानंतर हिललाईन पोलिसांच्या ताब्यात दिले. तर खूनातील अल्पवयीन मुलालाही १४ नाेव्हेेंबर राेजी हिललाईन पाेलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Web Title: Murder of woman in live-in due to immoral relationship: Accused arrested from Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.