VIDEO: प्रेमविवाहाच्या वादातून दिवसाढवळ्या तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 06:46 PM2021-05-13T18:46:58+5:302021-05-13T18:53:42+5:30

पाच ते सात जणांनी वर्दळ असलेल्या रस्त्याच्या शेजारी केली तरुणाची हत्या; उपस्थितांनी घेतली बघ्याची भूमिका

murder captured in camera group of youngsters killed one in ambernath | VIDEO: प्रेमविवाहाच्या वादातून दिवसाढवळ्या तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या; परिसरात खळबळ

VIDEO: प्रेमविवाहाच्या वादातून दिवसाढवळ्या तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या; परिसरात खळबळ

Next

अंबरनाथ : प्रेमविवाह केल्याच्या वादातून अंबरनाथमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोड परिसरात घडलेला हा प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे.

विजय नवलगिरे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो रिक्षाचालक होता. विजय याने ११ महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिमेतील एका मुलीशी प्रेमविवाह केला होता. अंबरनाथच्या बी केबिन रोड परिसरातील छाया अपार्टमेंटमध्ये तो पत्नीसह राहत होता. विजयची पत्नी ज्या परिसरात राहत होती, त्या भागातले काही तरुण विजयला आमच्या भागातल्या मुलीशी प्रेमविवाह का केला? असं म्हणत गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होते. त्यातूनच आज दुपारी ३.३० च्या सुमारास विजयच्या घरी ५ ते ७ तरुण आले आणि त्यांनी विजयला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला घराबाहेर आणत त्याच्या डोक्यात फरशी घालण्यात आली. त्यानंतर त्याच्या डोक्यात मोठा दगड घालत त्याची हत्या करण्यात आली.

 

विजयची हत्या होत असताना त्याची पत्नी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र आरोपीने त्याच्या पत्नीला बाजूला सारत या तरुणाची हत्या केली. मुख्य रस्त्यावर हा प्रकार सुरू असताना एका अज्ञात वाटसरूने हा प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रित केला. या घटनेनंतर पोलिसांनी काही मिनिटात घटनास्थळी धाव घेत पळून जात असलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेतले, तर इतर आरोपींचा शोध सध्या सुरू आहे.
 

Web Title: murder captured in camera group of youngsters killed one in ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app