मुरबाड-बदलापूर आता जा सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:20 AM2019-03-11T00:20:44+5:302019-03-11T00:21:05+5:30

दहा किलोमीटरने अंतर होणार कमी, पोटगाव येथील पूल झाला खुला

Murbad-Badlapur will go now | मुरबाड-बदलापूर आता जा सुसाट

मुरबाड-बदलापूर आता जा सुसाट

googlenewsNext

बदलापूर : बदलापूर आणि मुरबाड या दोन्ही शहरांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणजे बारवी डॅम रोड. मात्र या रस्त्यावर अनेक वळणे असल्याने आणि हे अंतर सरासरी २८ किलोमीटरचे असल्याने ते कमी करण्यासाठी नव्या रस्त्याचा वापर वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. बदलापूर राहटोली मार्गे पोटगावला जाणारा रस्ता हा अरुंद असल्याने त्याचा वापर कमी होत होता. मात्र या रस्त्याचे रुंदीकरण करून या रस्त्याची दुरूस्ती केली जात आहे. त्यामुळे या रस्त्याचा वापर सुरू झाल्यावर सरासरी १० किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे.

बदलापूर आणि मुरबाड हे दोन्ही शहर एकाच विधानसभा मतदारसंघात असल्याने हे दोन्ही शहरे जोडण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यातील एक मार्ग हा बारवी डॅम मार्गे असून दुसरा रस्ता हा बोराडपाडा-म्हसा मार्गे मुरबाडला जातो. बदलापूर ते मुरबाड हा रस्ता बारवी डॅम मार्गे गेल्यास २८ किमीचे अंतर कापावे लागते. तर म्हसामार्गे गेल्यास हेच अंतर ३२ किमीचे होते. त्यामुळे या दोन शहरांना जोडणारा आणि अंतर कमी करणारा रस्ता वापरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याला राहटोली-पोटगांव या रस्त्याचे जोडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. हा आदिवासी पाडा असल्याने या रस्त्याचा वापर कमी होत होता. त्यातच हा रस्ता अरूंद असल्याने आणि हा रस्ता काही भागात खराब असल्याने अनेकजण या रस्त्याचा वापर करत नव्हते. अनेकांना तर या रस्त्याची कल्पनाच नव्हती.

बदलापूर आणि मुरबाड या दोन शहरांच्या मध्यावर पोटगांव भागात नवीन पुलाचे कामही पूर्ण झाले आहे. पोटगांव जवळील नदीवरील या पुलाच्या कामासाठी एमआयडीसीने पाच कोटी ८८ लाखांची तरतूद केली होती. या निधीतून नदीवरील अरूंद आणि धोकादायक झालेल्या पुलाला पर्यायी पूल तयार केला असून तो खुला करण्यात आला आहे. या पुलामुळे मुरबाड आणि बदलापूरला जोडणारा नवा रस्ता वाहनचालकांना उपलब्ध झाला आहे. या रस्त्यामुळे मुरबाडकर आणि बदलापूरकरांना दोन्ही शहरात कमी वेळेत आणि कमी इंधनाचा वापर करुन जाता येणार आहे.

Web Title: Murbad-Badlapur will go now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.