भिवंडीतील अतिक्रमणांवर मनपाची कारवाई

By नितीन पंडित | Published: December 28, 2023 07:37 PM2023-12-28T19:37:49+5:302023-12-28T19:38:10+5:30

शहरातील तीनबत्ती परिसरातील अतिक्रमणांवर मनपा प्रशासनाने कारवाई केली आहे.

Municipality action on encroachments in Bhiwandi | भिवंडीतील अतिक्रमणांवर मनपाची कारवाई

भिवंडीतील अतिक्रमणांवर मनपाची कारवाई

भिवंडी: भिवंडी शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी अतिक्रमणे केली असून त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा बडगा उगारला आहे. गुरुवारी शहरातील तीनबत्ती परिसरातील अतिक्रमणांवर मनपा प्रशासनाने कारवाई केली आहे.

शहरातील मुख्य बाजार असलेल्या तीन बत्ती परिसरातील दुकानासमोर करण्यात आलेल्या अतिक्रमणवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी प्रभाग समिती क्रमांक ५ चे सहायक आयुक्त राजेंद्र वरळीकर यांना दिले होते. त्या नुसार राजेंद्र वरळीकर यांनी तीनबत्ती लाला शॉपिंग परिसरातील दुकानासमोर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर कारवाई केली आहे.जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यात आली असून यामुळे तीनबत्ती परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असल्याने महापालिका प्रशासनाने केलेल्या या कारवाईचा नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
 

Web Title: Municipality action on encroachments in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.