शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

पालिकेची परिवहन समिती तब्बल 12 वर्षांनंतर पुनरुज्जीवित होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 16:39 IST

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहन विभागावर अंकुश ठेवण्यासाठी २००५ मध्ये स्थापन करण्यात आलेली समिती तब्बल १२ वर्षांनंतर पुनरुज्जीवित केली जाणार आहे.

राजू काळेभाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहन विभागावर अंकुश ठेवण्यासाठी २००५ मध्ये स्थापन करण्यात आलेली समिती तब्बल १२ वर्षांनंतर पुनरुज्जीवित केली जाणार असून, तसा निर्णय येत्या ८ नोव्हेंबरच्या महासभेत होण्याची शक्यता आहे. या समितीत निवडून आलेल्या सदस्यांची नियुक्ती करणे अनिवार्य नसल्याने त्यात गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांसह निकटवर्तीयांना संधी देण्यात येणार असल्याचे भाजपा, सेना व काँग्रेसच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.मीरा-भार्इंदरमध्ये २००५ पुर्वी गोराई, उत्तन, चौक, मनोरी, ठाणे, भिवंडी येथे जाण्यासाठी प्रवाशांकडून स्थानिक परिवहनचे साधन म्हणून एसटीचा वापर होत होता. २००५ नंतर एसटी हद्दपार झाली असली तरी एसटीचा ठाणे पर्यंतचा प्रवास आजही भार्इंदर येथून सुरू  आहे. २००२ मध्ये मीरा-भार्इंदर नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाल्याने २००५ मध्ये प्रशासनासमोर एसटीच्या जागी स्थानिक परिवहन सुरू करण्याचा प्रश्न उपस्थित झाला.अखेर पालिकेने १५ सप्टेंबर २००५ रोजी ती तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कंत्राटी पद्धतीवर सुरू केली. त्यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना, बहुजन विकास आघाडी व अपक्षांची सत्ता होती. पालिकेने स्वखर्चातून ५० बस खरेदी केल्या. त्यापैकी अंदाजे २० बस कंत्राटदारांकडून खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सेवा सुरू करण्याचे कंत्राट राजकीय हितसंबंधातील व्यक्तींना देण्यात आले. प्रतिकिलोमीटरमागे पालिकेने १९ रुपये दर निश्चित करून पालिकेने कंत्राटदार व राजकीय मंडळींचे भले करण्यास सुरुवात केली. यापोटी पालिकेला दरवर्षी लाखोंचा तोटा सहन करावा लागत असला तरी त्याचे सोयरसुतक ना कंत्राटदारांना, ना राजकीय मंडळी व ना प्रशासनाला होते. दरम्यान परिवहन विभागावर अंकुश ठेवण्यासाठी २००५ मध्येच पहिल्या वहिल्या १२ सदस्यीय परिवहन समितीची स्थापना २००५ मध्येच केली. त्यावर पहिले सभापती म्हणून शांताराम ठाकूर यांची निवड करण्यात आली. उर्वरीत सदस्यांत त्यावेळच्या स्थायी समितीचे सभापती तुळशिदास म्हात्रे, विद्याधर रेवणकर, रेनॉल्ड बेचरी, प्रशांत पालंडे, अशोक तिवारी, मुनीस विल्यम, उमा पाटील, सुनिता पाटील, उस्मान नुरले, चंद्रकांत मोदी, श्यामराव मदने व डॉ. सुरेश येवले यांचा समावेश होता.या समितीसह विभागाचा कारभार हाकण्यासाठी २००७ मध्ये पुर्वीचे मुख्यालय असलेल्या नगरभवनमध्ये स्थानिक परिवहन विभागाचे मुख्य कार्यालय सुरु करण्यात आले. त्याचे उद्घाटन महापौरपदी असलेले अपक्ष नगरसेवक नरेंद्र मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. या सेवेचा सतत वाढणारा तोटा असह्य होऊ लागल्याने पालिकेने २०१० मध्ये कंत्राटी सेवा मोडीत काढली. ९ आॅक्टोबर २०१० मध्ये खासगी-लोक सहभाग तत्वावरील नवीन परिवहन सेवा त्यावेळचे आ. गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरू करण्यात आली. या नवीन सेवेच्या सुुरुवातीपूर्वीच २००९ मध्ये स्थानिक परिवहन समितीला नारळ देण्यात आला. त्यानंतर आजतागायत समितीची पुनर्स्थापना करण्यात आली नाही. मात्र येत्या ८ नोव्हेंबरच्या महासभेत तिला पुनरुज्जीवित करण्याची शक्यता आहे. त्याला मान्यता मिळाल्यास लवकरच त्यात तौलनिक संख्याबळानुसार भाजपा, सेना व काँग्रेसला अनुक्रमे ९, २ व १ जागा मिळणार आहे. यातही भाजपाचाच वरचष्मा राहणार असल्याने त्याची दोर मात्र त्यावेळचे महापौर व सध्याचे आ. नरेंद्र मेहता यांच्या हातीच राहणार आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक