शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना कडक सॅल्यूट! हरवलेले ३३,५१४ मोबाइल परत केले; युपीतच १६५० सापडले, २ कोटी...
2
पात्र, अपात्र धारावीकरांना धारावीतच घर; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार: मुख्यमंत्री फडणवीस
3
आजचे राशीभविष्य : रविवार ११ जानेवारी २०२६; आर्थिक लाभ आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण खुश व्हाल, अचानक नशिबाची साथ मिळेल 
4
"बीस साल बाद एकत्र आलेले विकासात खोडा घालत आहेत"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना शुभ-फलदायी, पैशांचा ओघ राहील; ४ राशींना संघर्ष, संमिश्र काळ!
6
हिस्ट्री शीटर ते थेट निवडणुकीच्या रिंगणात; अंगावर २५ गुन्हे असलेल्या सज्जू मलिकला राष्ट्रवादीकडून उमेदवारी
7
दाढीवाले जातीय तेढ निर्माण करून मागतात मते; सरकार नसून तमासगीर झालंय: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजपने विकास केला म्हणून 'ते' वैतागले आहेत; मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्यावर बोलणे टाळले
9
'अहमदाबादचे नामांतर करण्याची हिंमत दाखवा'; अमित शाहांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचे आव्हान
10
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
11
महापालिका रणांगणात मनसेची 'नवी फळी'; २६ उमेदवार कोट्यवधी संपत्तीचे मालक
12
पास घरी राहिला म्हणून चिमुकल्याला कंडक्टरने एसटीतून हायवेवर उतरवले!
13
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
14
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
15
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
16
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
17
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
18
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
19
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
20
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
Daily Top 2Weekly Top 5

'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 20:55 IST

Municipal Election 2026: माझ्या नादी लागू नका टांगा पलटी घोडे लापता अशी परिस्थिती होईल, असा इशारा गणेश नाईक यांनी दिला होता. त्यानंतर आता गणेश नाईक नाईक यांची मनस्थिती बिघडली आहे. त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा, असा टोला शिंदेसेनेने लगावला आहे.

एकीकडे मुंबई, ठाणे अशा महत्त्वाच्या महानगपालिकांमध्ये भाजपा आणि शिंदेसेना हे महायुतीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढत आहेत, तर दुसरीकडे शिंदेसेना आणि भाजपाचे मंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये प्रचारादरम्यान, तुफान वाकयुद्ध रंगलेलं दिसत आहे.  भविष्यकाळात यांची जागा तुरुंगात असेल, असा दावा गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केला होता. तसेच माझ्या नादी लागू नका टांगा पलटी घोडे लापता अशी परिस्थिती होईल, असा इशाराही गणेश नाईक यांनी दिला होता. त्यानंतर आता गणेश नाईक नाईक यांची मनस्थिती बिघडली आहे. त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा, असा टोला शिंदेसेनेने लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने आरोपांच्या फैरी झाडत असलेल्या गणेश नाईक यांच्यावर टीका करताना शिंदेसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के म्ङणाले की, गणेश नाईक यांना नवी मुंबईमधील पराभव दिसून लागला आहे. नवी मुंबईतील जनता त्यांना नाकारतेय. हे त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. मी नाईक जनता पार्टीच्या नेत्यांना सल्ला देतो की, त्यांना लवकरात लवकर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडे घेऊन जावं. त्यांची योग्य ती तपासणी करावी. त्यांची मनस्थिती बिघडलेली आहे, त्यामुळे ते अशा पद्धतीची विधाने करताहेत, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.

दरम्यान, शिंदेसेनेसोबत झालेल्या युतीबाबत मोठा दावा करताना गणेश नाईक म्हणाले होते की, "भाजपाचे केंद्रीय नेतृत्व दिलेल्या शब्दाला जागणारं नेतृत्व आहे. म्हणून आता आपली गरज संपल्यानंतरही घटक पक्षांना बाजुला करू नये, या अतिशय चांगुलपणाच्या भावनेपोटी केंद्रीय नेतृत्वाने या गोष्टी करण्यास मनाई केली आणि परिणामी काही ठिकाणी युती झाली. मात्र मी आज सांगतो २०२९ मध्ये मतदार पुनर्रचना होईल ना, त्यावेळी सगळ्यांची चित्र स्पष्ट होतील. होत्याचं नाहीसं होऊन जाईल. जनतेला माहिती आहे की प्राबल्य कुठून आणि कसं आलं? मी बोललो पैसा कमवा, पण तो कुठल्या मार्गाने आला, तो मार्ग जनसामान्यांना पटवून द्या, असा टोलाही नाईक यांनी लगावला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde faction mocks Ganesh Naik, suggesting mental health evaluation.

Web Summary : Amidst political tensions, Shinde's party criticizes Ganesh Naik's mental state, advising a psychiatric evaluation after Naik's critical remarks. Naik alleges BJP using allies until needed.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Ganesh Naikगणेश नाईकEknath Shindeएकनाथ शिंदेnaresh mhaskeनरेश म्हस्केShiv SenaशिवसेनाBJPभाजपा