शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

महापालिकेचा डोलारा ६०७ कोटींनी कोसळला; फसव्या आकड्यांचा फुगा फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 00:06 IST

प्रशासनाने बुधवारी सादर केलेल्या सुधारित अर्थसंकल्पात शहर विकास शुल्क सुमारे २३३ कोटी ९० लाखांनी करावे लागले असून, ते १०२४ ऐवजी ७९०.१० कोटी इतकेच उत्पन्न अपेक्षित धरले आहे.

नारायण जाधव ठाणे : महापालिका आयुक्त, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात मोठमोठ्या प्रकल्पांची घोषणा करून त्यासाठी उत्पन्नाचे आकडे अव्वाच्या सव्वा फुगविले. मात्र, प्रत्यक्षात आर्थिक वर्ष संपायला आले, तेव्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी फुगविलेला हा फुगा फुटलाच नाही तर आर्थिक मंदीने पार कंबरडे मोडले. यामुळे प्रशासनाने गेल्या वर्षी प्रस्ताविलेले उत्पन्नाचे आकडे कमी करावे लागले. यामुळे गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात महापालिकेचे तब्बल ६०७ कोटींनी कमी करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. याचे पडसाद २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात उमटून प्रशासनावर नव्या प्रकल्पांना आवर घालून उत्पन्नाचे आकडे कमी दाखवावे लागले आहेत.

प्रशासनाने बुधवारी सादर केलेल्या सुधारित अर्थसंकल्पात शहर विकास शुल्क सुमारे २३३ कोटी ९० लाखांनी करावे लागले असून, ते १०२४ ऐवजी ७९०.१० कोटी इतकेच उत्पन्न अपेक्षित धरले आहे. जीसएसटीचे उत्पन्नही २९ कोटींनी कमी करून ते ९८७.७० कोटी ऐवजी ९५८.७० कोटी दाखवावे लागले आहे. पाणीकरांची वसुलीही १७५ ऐवजी १५ कोटींनी कमी करून ती १६० कोटींवर आणली आहे. अग्निशमन शुल्क ६४ कोटी आठ लाखांनी कमी करून ते १५० कोटी आठ लाखऐवजी ८६ लाख गृहित धरले आहे. रस्ते खोदाई शुल्कही मोठ्या प्रमाणात रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेऊनही ७५ कोटींऐवजी ६० कोटींनी कमी करून अवघे १५ कोटी दाखविले आहे. स्थावर मालमत्तेपासूनच्या उत्पन्नातही घट झाली असून ते प्रस्तावित २० कोटी ४१ लाखांऐवजी १८ कोटी २७ लाख इतकेच अपेक्षित धरले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अनुुदानातही अनपेक्षित घट झाली असून ते २६० कोटी ९३ लाखांऐवजी १६३ कोटी सात हजार इतकेच मिळेल असे गृहीत धरले असून, त्यात सुमारे ९७ कोटी ७६ लाख इतकी घट दाखविली आहे.चालू वर्षांत तारे जमीं पर२०१९-२० च्या अर्थसंकल्पात फुगवलेल्या उत्पन्नाचे आकडे फसवे निघाल्याने प्रशासनाने २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात जमिनीवर येण्याचे भान दाखवून त्यानुसार उत्पन्न अपेक्षित गृहित धरले आहे. यात मालमत्ताकरापासून ६७० कोटी, क्लस्टर असूनही शहर विकास शुल्कापासून ८९३ कोटी, जीएसटी १०८४ कोटी, करवाढीमुळे पाणीकराचे उत्पन्न २२५ कोटी, अग्निशमन शुल्क १०० कोटी, रस्ते खोदाई शुल्क ३० कोटी २५ लाख, स्थावर मालमत्तेचे उत्पन्न २२ कोटी आणि शासकीय अनुदानांपासून १६३ कोटी सात लाख रुपये असे उत्पन्न दाखवून नवे प्रकल्प, लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडणे टाळले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका