मुंब्रा बायपास ३० आॅगस्टपर्यंत खुला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 04:57 IST2018-07-19T04:57:07+5:302018-07-19T04:57:20+5:30
दुुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेला मुंब्रा बायपास येत्या ३० आॅगस्टपर्यंत खुला करण्यात येईल

मुंब्रा बायपास ३० आॅगस्टपर्यंत खुला
ठाणे / मुंब्रा : दुुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेला मुंब्रा बायपास येत्या ३० आॅगस्टपर्यंत खुला करण्यात येईल, असे पनवेल सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालयीन अधीक्षक अभियंता आर. एस. पाटील आणि कार्यकारी अभियंता सतीश शिरगावे यांनी बुधवारी केलेल्या पाहणीनंतर सांगितले. मात्र, सुरुवातीला एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल.
बायपास दुरुस्तीचे काम ८ मे रोजी सुरू झाले. दुरु स्तीला उशीर होत असल्याने, राष्ट्रवादीचे कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राध्यक्ष शमीम खान, नगरसेवक शानू पठाण यांनी काम वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली. त्यानुसार, बुधवारी अधीक्षक अभियंता पाटील, कार्यकारी अभियंता शिरगावे यांनी कामाची पाहणी केली.