कामाच्या तणावातून मुंबईतील पोलीस उपनिरीक्षकाची ठाण्यात आत्महत्या

By जितेंद्र कालेकर | Published: September 30, 2019 09:55 PM2019-09-30T21:55:59+5:302019-09-30T22:23:33+5:30

मुंबईतील अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक असलेल्या धनाजी राऊत यांनी ठाण्यातील रेप्टाक्र ॉस कंपनीच्या मैदानात एका झाडाला साडीच्या सहायाने गळफास घेतल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. एका पोलीस अधिका-याच्या अशा प्रकारे आत्महत्येच्या घटनेने मुंबई आणि ठाणे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

Mumbai's Police sub Inspector hang himself due to work stress at Thane | कामाच्या तणावातून मुंबईतील पोलीस उपनिरीक्षकाची ठाण्यात आत्महत्या

रेप्टाक्रॉस कंपनीच्या मैदानात एका झाडाला घेतला गळफास

Next
ठळक मुद्देरेप्टाक्रॉस कंपनीच्या मैदानात एका झाडाला घेतला गळफासकामाचा ताण असल्याची पत्नीजवळ व्यक्त केली होती हतबलतावर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे: कामाच्या तणावातून मुंबई रेल्वेतील पोलीस उपनिरीक्षक धनाजी राऊत (३५) यांनी ठाण्यात आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास वर्तकनगर भागात घडली. त्यांच्या मागे पत्नी वनिता आणि दोन मुले असा परिवार आहे.
सकाळी नेहमीप्रमाणे ते व्यायामासाठी बाहेर पडल्यानंतर रेप्टाक्रॉस कंपनीच्या मैदानात एका झाडाला साडीच्या सहायाने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते हाफ पॅन्ट आणि टी शर्टवर सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास आढळून आले. ही माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांसह पोलिसांनी त्यांना तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घोषित केले.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात २००६ मध्ये वाहक पदावर भरती झालेल्या धनाजी यांनी २०१६ मध्ये उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. सध्या ते रेल्वेच्या अंधेरी येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होते. गेली १३ वर्षे पोलीसमध्ये चालक म्हणून नोकरी केल्यानंतर थेट उपनिरीक्षक म्हणून नोकरी करतांना त्यांची खात्यामध्ये मोठी कसरत होत होती. यातूनच ते गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. तशी हतबलता त्यांनी काही सहकारी आणि आपल्या पत्नीकडेही बोलून दाखविली होती. वर्तकनगर येथील एमएमआरडीएच्या दोस्ती रेंटलमधील बी-४ या इमारतीमधील नवव्या मजल्यावरील ९१७ क्रमांकाच्या खोलीत राऊत हे पत्नीसह वास्तव्याला होते. तर सुमित (१६) आणि आणि अश्विनी (१३) ही दोन्ही मुले गावी शिकण्यासाठी होती. अत्यंत शांत आणि सरळ स्वभावाचे धनाजी इतक्या तणावात असतील, असे कधीच वाटले नाही, असे त्यांच्याच घराच्या बाजूला राहणाºया एका पोलीस कर्मचाºयाने सांगितले. त्यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटूंबियांसह संपूर्ण पोलीस वसाहतीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव अधिक तपास करीत आहेत.
-------------

आज डबा उशिरा बनव...
दररोज सकाळी मोकळया हवेत फेरफटका मारण्यासाठी जाणा-या धनाजी यांना नियमित व्यायामाची सवय होती. २९ सप्टेंबर रोजी त्यांची साप्ताहिक सुटी होती. तर सोमवारी त्यांना दिवसपाळी होती. आज डबा उशिरा बनव असे सांगून घरातून पहाटे ४.१५ वाजताच घराबाहेर पडले. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ते घरात न परतल्यामुळे त्यांच्या पत्नीने शेजारी राहणा-या महाडीक कुटूंबियांकडे चौेकशी सुरु केली. त्यांनतर काही वेळातच त्यांच्या आत्महत्येची घटना वर्तकनगर पोलिसांना समजली.
 

Web Title: Mumbai's Police sub Inspector hang himself due to work stress at Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.