शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कामाच्या तणावातून मुंबईतील पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 5:58 AM

कामाच्या तणावातून मुंबई रेल्वेतील पोलीस उपनिरीक्षक धनाजी राऊत (३५) यांनी ठाण्यात आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी वर्तकनगर भागात घडली.

ठाणे : कामाच्या तणावातून मुंबई रेल्वेतील पोलीस उपनिरीक्षक धनाजी राऊत (३५) यांनी ठाण्यात आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी वर्तकनगर भागात घडली. त्यांच्यामागे पत्नी वनीता आणि दोन मुले असा परिवार आहे.सकाळी नेहमीप्रमाणे ते व्यायामासाठी बाहेर पडल्यानंतर रेप्टाक्र ॉस कंपनीच्या मैदानात एका झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास आढळून आले. ही माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांसह पोलिसांनी त्यांना तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घोषित केले.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात २००६ मध्ये वाहकपदावर भरती झालेल्या धनाजी यांनी २०१६ मध्ये उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. सध्या ते रेल्वेच्या अंधेरी येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होते. गेली १३ वर्षे पोलीसमध्ये चालक म्हणून नोकरी केल्यानंतर थेट उपनिरीक्षक म्हणून नोकरी करताना त्यांची खात्यामध्ये मोठी कसरत होत होती. यातूनच ते गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. तशी हतबलता त्यांनी काही सहकारी आणि आपल्या पत्नीकडेही बोलून दाखवली होती. इतक्या तणावात नोकरी करण्यापेक्षा आपण गावी जाऊन शेती करू, असा सल्लाही त्यांची पत्नी वनीता यांनी त्यांना अगदी दोन ते चार दिवसांपूर्वीच दिला होता, अशीही माहिती ते वास्तव्यास असलेल्या इमारतीमधील काही महिलांनी ‘लोकमत’ला दिली.वर्तकनगर येथील एमएमआरडीएच्या दोस्ती रेंटलमधील बी-४ या इमारतीमधील नवव्या मजल्यावरील ९१७ क्रमांकाच्या खोलीत राऊत हे पत्नीसह वास्तव्याला होते. तर सुमित (१६) आणि अश्विनी (१३) ही दोन्ही मुले गावी शिकण्यासाठी होती. त्यांची पत्नीही पालघर जिल्ह्यातील देहरे (ता. जव्हार) येथे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्याला होती. ते उपनिरीक्षक झाल्यानंतर त्यांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून त्या दोन महिन्यांपूर्वीच ठाण्यात वास्तव्याला आल्या होत्या. अत्यंत शांत आणि सरळ स्वभावाचे धनाजी इतक्या तणावात असतील, असे कधीच वाटले नाही, असे त्यांच्याच घराच्या बाजूला राहणाऱ्या एका पोलीस कर्मचा-याने सांगितले. त्यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण पोलीस वसाहतीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.बँकेतील रक्कम केली पत्नीच्या नावानेधनाजी यांनी अलीकडेच त्यांच्या नावाने बँकेत असलेली सर्व रक्कम पत्नीच्या बँक खात्यावर वळती केली. महिलांना करात सवलत असल्याचे कारण देऊन ही रक्कम वळती केल्याचे त्यांनी सांगितले होते, अशीही माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड अधिक तपास करीत आहेत. राऊत यांना काहीही अडचणी किंवा समस्या असत्या, तर त्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली असती, तर काही तरी मार्ग काढता आला असता, असे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आज डबा उशिरा बनव...दररोज सकाळी मोकळ्या हवेत फेरफटका मारण्यासाठी जाणाºया धनाजी यांना नियमित व्यायामाची सवय होती. २९ सप्टेंबर रोजी त्यांची साप्ताहिक सुटी होती, तर सोमवारी त्यांना दिवसपाळी होती. आज डबा उशिरा बनव, असे सांगून घरातून पहाटे ४.१५ वाजताच घराबाहेर पडले. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ते घरी न परतल्यामुळे त्यांच्या पत्नीने शेजारी राहणाºया महाडिक कुटुंबीयांकडे चौकशी सुरू केली. त्यानंतर, काही वेळातच त्यांच्या आत्महत्येची घटना वर्तकनगर पोलिसांना समजली.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसthaneठाणे