शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
5
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
6
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
7
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
8
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
9
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
10
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
11
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
12
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
13
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
14
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
15
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
16
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
17
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
18
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
19
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
20
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!

Mumbai Bandh : ठाण्यात मराठा आंदोलकांकडून जाळपोळ आणि तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 10:49 IST

ठाण्यातील वागळे इस्टेट येथे सकाळी आंदोलकांनी टीएमटीच्या बसची तोडफोड केली.

ठाणे - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चानं आज मुंबई , ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, अकोला, सातारा बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण प्राप्त झाले आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट येथे सकाळी आंदोलकांनी टीएमटीच्या बसची तोडफोड केली. शिवाय, तीन हात नाका परिसरात आंदोलकांनी घोषणाबाजी करत मुंबईकडे येणारी वाहतूक रोखून धरल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे, माझीवाडा पुलावर आंदोलकांनी टायर जाळून निषेध नोंदवला.

दरम्यान,  मुंबई पोलिसांकडून मराठा आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. तसंच कोणतीही अडचण आल्यास किंवा अप्रिय घटना घडल्यास 100 नंबर आणि ट्विटर अकाऊंटवर माहिती देण्याची सूचना पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आली आहे. आंदोलनावेळी समाजकंटकांकडून काही अनुचित प्रकार घडवला जाऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने संपूर्ण राज्यात घडणा-या हालचालींवर बारीक नजर ठेवली आहे. विशेष शाखेकडून सर्व घटनांचा आढावा घेतला जात आहे. मुंबई पोलिसांसह राज्य राखीव सुरक्षा बल, केंद्रीय सुरक्षा बल, शीघ्रकृती दल (क्यूआरटी), फोर्स वन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) शहरात तैनात आहेत.

(Mumbai Bandh Live - मराठा आंदोलक आक्रमक, आंदोलकांकडून लोकल रोखण्याचा प्रयत्न)

LIVE UPDATES :

 

- ठाणे स्थानकात आंदोलकांचा रेलरोको

-हिरानंदानी इस्टेटमधून ठाणे स्टेशनला जाणाऱ्या खासगी बसेसची सर्व्हिस खोळंबली, फक्त माजीवडापर्यंत बस जात असल्याने प्रवाशांची तारांबळ- कोपरी पूल आणि महामार्गावर वाहतूक कोंडी

(... तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल, पवारांनी दाखवला फडणवीसांना मार्ग)मराठा क्रांती मोर्चाची आचारसंहिता हे करावे!1. मराठा तरुणांनी हा बंद शांततापूर्ण वातावरणात पार पाडायचा आहे. आंदोलनात घुसून तोडफोड करणाºया प्रवृत्तीपासून समाजाची बदनामी होणार नाही, याबाबत जागरूक राहून बंद यशस्वी पार पाडावा.2. कोणत्याही प्रकारच्या इतर समाजाच्या भावना दुखावणा-या आणि सामाजिक तेढ निर्माण करण्यापासून स्वत:ला आणि इतरांना आवर घालावा.3. इतर समाज बांधवांनी कृपया हे आंदोलन शासनासोबत असल्याने मराठा समाजाला सहकार्य करावे, जेणेकरून आपल्या सर्वांचे प्रश्न मार्गी लागतील.4. प्रक्षोभक पोस्ट, व्हिडीओ व्हायरल न करता आपआपल्या जिल्ह्यांतील समन्वयक मराठा सेवकाांशी संपर्क ठेवून पोलीस प्रशासनाला गैरप्रकार करणाºया लोकांची माहिती द्यावी.5. कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडून आंदोलन चिघळले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.6. आपल्या समस्या सोडविणे सर्वपक्षीय नेत्यांची जबाबदारी होती आणि राहील. आपण आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर असून राजकारणासाठी नाही, याची जाणीव सर्वांनी ठेवून कृती करावी.हे करू नये!1. मराठा समाजाचा आक्रोश हा राजकीय पक्ष आणि सरकारविरोधी असून त्याला जातीय रंग देऊ नये.2. रुग्णवाहिका आणि अतिमहत्त्वाच्या सेवा देणा-या सेवा दवाखाने, मेडिकल यांच्यावर बंदसाठी दबाव टाकू नये.3. या आंदोलनादरम्यान घोषणा आणि आपला आक्रोश व्यक्त करीत असताना अश्लील भाषा आणि अनुचित प्रकाराचा वापर करू नये.4. पोलीस प्रशासनाशी हुज्जत न घालता त्यांच्याशी समन्वय साधून आंदोलन यशस्वी करावे.5. पोलीस प्रशासनाने आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न करून वातावरण चिघळू देऊ नये.6. महिला आणि मुले यांना त्रास होणार नाही किंवा त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.7. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये; अथवा गोंधळ माजेल अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकू नयेत.8. कोणत्याही प्रकारे या आंदोलनाला राजकीय वळण लागू देऊ नये.

 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाthaneठाणेMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMumbaiमुंबई