अवकाळीने बाजारपेठेतील रस्ते चिखलमय; वीटभट्टी व्यावसायिक हवालदिल
By नितीन पंडित | Updated: March 7, 2023 15:45 IST2023-03-07T15:44:55+5:302023-03-07T15:45:19+5:30
शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याने ग्रामीण भागात वीट उत्पादक देखील अहवाल दिल झाले

अवकाळीने बाजारपेठेतील रस्ते चिखलमय; वीटभट्टी व्यावसायिक हवालदिल
नितीन पंडित
भिवंडी - मंगळवारी पहाटेपासून भिवंडीत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.या अवकाळी पावसामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर पाणी साचले होते, तर काही ठिकाणी रस्ते चिखलमय झाले होते . या चिखलमय रस्त्यातून मार्ग काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागली होती.
शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याने ग्रामीण भागात वीट उत्पादक देखील अहवाल दिल झाले असून अनेक वीट भट्टी मालकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.तर तयार विटांवर प्लास्टिक टाकण्यात वीट उत्पादकांची मोठी धावाधाव झाली होती. तर अनेक वीटभट्टी मालकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असल्याने शासनाने वीटभट्टी मालकांना नुकसान भरपाई द्यावी असे मागणी वीट उत्पादकांकडून होत आहे.