खासदार बाळ्या मामा यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

By नितीन पंडित | Updated: February 14, 2025 15:20 IST2025-02-14T15:20:18+5:302025-02-14T15:20:51+5:30

या भेटीदरम्यान येथील गुन्हेगारांवर व ड्रग्स माफियांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी खा.बाळ्या मामा यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे.

mp suresh mhatre balya mama meet union home minister amit shah | खासदार बाळ्या मामा यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

खासदार बाळ्या मामा यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी:भिवंडी लोकसभा मतदारसंघात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून वाढत्या गुन्हेगारी बरोबरच शहरात अवैध ड्रग्स व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात सुरू असून या अवैद्य ड्रग्स माफियांमुळेच शहरात व आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारी प्रचंड वाढली असल्याने गुन्हेगारांसह ड्रग्स माफियांवर कठोर कारवाई करावी या संदर्भात भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे गुरुवारी भेट घेतली.या भेटीदरम्यान येथील गुन्हेगारांवर व ड्रग्स माफियांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी खा.बाळ्या मामा यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे.

लोकसभा मतदारसंघातील वाढत्या गुन्हेगारी व ड्रग माफियांबाबत खा. म्हात्रे यांनी थेट संसदेत आवाज उठवला होता.त्यानंतर पोलीस यंत्रणेने काही गुंडांवर अटक कारवाई केली आहे.तसेच ऑगस्ट २०२४ मध्ये गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने भिवंडी शहरात मोठी कारवाई करून ८०० कोटी रुपये किमतीचा ७९२ किलो लिक्विड एमडी ड्रगचा साठा जप्त करून दोघा जणांना अटक केली आहे.मात्र या दोन आरोपींपर्यंतच ही कारवाई थांबली असून या दोघा आरोपींच्या मागे सूत्रधार कोण आहेत याचा तपास करावा.गुजरात एटीएसच्या कारवाई नंतरही शहरात अवैध ड्रग्स व्यवसाय मोठ्या प्रमाणात आजही सुरूच असून शहरातील ड्रग्स माफीये व त्यांच्या सूत्रधारांवर कारवाई करावी अशी मागणी खा.बाळ्या मामा यांनी केली आहे.

विशेष म्हणजे ड्रग्स माफीये व गुन्हेगार न्यायालयातून जामिनावर सुटल्यानंतरही हत्या,हत्येचा प्रयत्न,चोरी,दरोडे,धमकी,खंडणी,शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावने असे गंभीर गुन्हे करत असून या गुंडांच्या मागे असलेल्या राजकीय शक्तीमुळे पोलीस यंत्रणेला गुन्हेगारांना अटक करतांना मोठी अडचण येत असल्याची बाब खा.बाळ्या मामा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशात आणली असून येथील ड्रग्स माफीये व गुन्हेगारांवर कारवाई करावी यासंदर्भातील आपल्या मागणीचे लेखी निवेदन देखील खा.म्हात्रे यांनी केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्याकडे दिले आहे.खा. म्हात्रे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने ड्रग्स माफीया आणि गुन्हेगारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे

केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या मागणीकडे विशेष लक्ष दिले असून लवकरात लवकर या संदर्भात पोलीस यंत्रणेला योग्य त्या सूचना देण्यात येतील असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्याला दिले आहे अशी प्रतिक्रिया खा. बाळ्या मामा यांनी दिली आहे.

Web Title: mp suresh mhatre balya mama meet union home minister amit shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.