शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

दहा रुग्णालयांसाठी कुमार केतकरांकडून अडीच कोटींचा खासदार निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:41 IST

ठाणे : येथील सिव्हिलसह जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये आदी आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये विविध सोयीसुविधांची गरज आहे. याकडे लक्ष ...

ठाणे : येथील सिव्हिलसह जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये आदी आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये विविध सोयीसुविधांची गरज आहे. याकडे लक्ष केंद्रित करून जिल्ह्यातील तब्बल दहा रुग्णालयांत वैद्यकीय साहित्यांसाठी ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभेचे सदस्य कुमार केतकर यांनी आपला अडीच कोटी रुपयांचा खासदार निधी दिला आहे. तसे पत्रच त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे शुक्रवारी दिले.

ठाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये विविध सोयीसुविधांची वानवा आहे. त्या संदीप आचार्य व विकास नाईक यांनी केतकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. कोरोनाच्या या कालावधीतील रुग्णालयांच्या सुविधांचे गांभीर्य लक्षात घेऊन केतकर यांनी त्यांच्या खासदारकीच्या निधीपैकी अडीच कोटींचा निधी जिल्ह्यातील या दहा रुग्णालयांसाठी दिला आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देतेवेळी ठाणे जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार उपस्थित होते.

प्रारंभी अवघ्या‌ २५ लाखांचा निधी देण्याची तयारी खा. केतकर यांनी दर्शवली होती. मात्र, डॉ. पवार यांच्यासह आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांच्या गरजा लक्षात घेऊन प्रस्ताव तयार करून त्याकडे खा. केतकर यांचे लक्ष वेधले होते. त्यावर त्यांनी लगेच अडीच कोटींचा निधी देण्याची सहमती दर्शवून तसे पत्रही जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले. कोरोनाकाळात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देणारे केतकर हे एकमेव खासदार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. अन्य खासदारांनीही आपला निधी कोरोनाच्या या कालावधीत सामाजिक बांधिलकी म्हणून दिला तर राज्यातील शासनाच्या अनेक रुग्णालयांना मोठी मदत होईल, अशी अपेक्षा प्रशासकीय पातळीवर व्यक्त केली जात आहे.

-------------

कँप्शन- जिल्ह्यातील दहा रुग्णालयांच्या सोयीसुविधा व वैद्यकीय साहित्यांसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे सहमती पत्र ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे देताना ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांच्यासह अन्य अधिकारी.