धावत्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञाताने दगड भिरकावला, मोटरमन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 11:13 IST2018-12-05T10:54:32+5:302018-12-05T11:13:31+5:30
धावत्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञाताने दगड भिरकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून नाशिककडे निघालेल्या राज्यराणी एक्सप्रेसवर वासिंद आणि आटगावच्या दरम्यान दगड भिरकावण्यात करण्यात आला.

धावत्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञाताने दगड भिरकावला, मोटरमन जखमी
कसारा - धावत्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञाताने दगड भिरकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून नाशिककडे निघालेल्या राज्यराणी एक्स्प्रेसवर वासिंद आणि आटगावच्या दरम्यान दगड भिरकावण्यात आला. मंगळवारी (4 डिसेंबर) रोजी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये इंजिनची काच फुटून तिचा तुकडा मोटरमनच्या डोळ्यात घुसल्याने मोटरमन जखमी झाला आहे.
राज्यराणी एक्स्प्रेस नाशिककडे जात असताना अचानक अज्ञाताने एक्स्प्रेसवर दगड भिरकावला. दगड मोठा असल्याने इंजिनची काच फोडून तो मोटरमनच्या केबिनमध्ये पडला. यामध्ये काचेचा तुकडा मोटरमनच्या डोळ्यात गेल्याने ते जखमी झाले आहेत. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून एक्स्प्रेस न थांबवता पुढे नेली आणि कसारा रेल्वे स्टेशनवर थांबवली. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर एक्स्प्रेस नाशिकडे रवाना झाली. या मार्गावर वारंवार होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.