ठाण्यात डंपरच्या धडकेमध्ये मोटारसायकलस्वार गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 16:42 IST2020-12-09T16:40:05+5:302020-12-09T16:42:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : डंपरच्या धडकेमध्ये इरफान शेख (३५) हा मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी ...

डंपरचे चाक गेले पायावरुन
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : डंपरच्या धडकेमध्ये इरफान शेख (३५) हा मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी भरतभाई पटेल (३४, रा. पालघर) या डंपर चालकाविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इरफान शेख हे मानपाडा येथून ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कापूरबावडी सिग्नलवर ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास लाल सिग्नल असल्यामुळे त्यांच्या मोटारसायकलसह उभे होते. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून भरघाव वेगाने आलेल्या पटेल याच्या डंपरने त्यांना धडक दिली. या अपघातामध्ये डंपरचे चाक इरफान यांच्या डाव्या पायावरुन गेल्यामुळे ते यामध्ये गंभीर जखमी झाले. यात त्यांच्या डाव्या पायाच्या पंजाचे हाड फ्रॅक्चर झाले. याप्रकरणी इरफान यांनी ६ डिसेंबर रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. ए. देशमुख याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.