मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र लांबवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 00:39 IST2021-05-15T00:27:49+5:302021-05-15T00:39:40+5:30
दुचाकीवरून आलेल्या २५ ते ३० वयोगटातील त्रिकूटाने मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना गुरुवारी कोरस हॉस्पिटल भागात घडली.

वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा
ठाणे : दुचाकीवरून आलेल्या २५ ते ३० वयोगटातील त्रिकूटाने मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना गुरुवारी कोरस हॉस्पिटल भागात घडली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमान्यनगर पाडा क्रमांक तीन येथे राहणारी ही ४९ वर्षीय गृहिणी गुरुवारी सकाळी ६.२५ वाजता लक्ष्मी पार्कजवळील वीणा मोटार ट्रेनिंग स्कूलसमोरील रस्त्याने तिच्या मैत्रिणीसमवेत जात होती. त्याचवेळी तेथे दुचाकीवरून आलेल्या त्रिकूटापैकी एकाने खाली उतरून या महिलेच्या गळ्यातील तिचे ४५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावले. नंतर त्यांनी दुचाकीवरून पोबारा केला. पोलीस उपनिरीक्षक पी.के. येरुणकर हे अधिक तपास करीत आहेत.