विनयभंग करणा-याने दिली पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 18:49 IST2017-11-23T18:49:38+5:302017-11-23T18:49:52+5:30
एका १२ वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नामदेव मुंडे (३२, मूळ रा. चाकूरगाव, लातूर) याला कोपरी पोलिसांनी

विनयभंग करणा-याने दिली पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी
ठाणे : एका १२ वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नामदेव मुंडे (३२, मूळ रा. चाकूरगाव, लातूर) याला कोपरी पोलिसांनी गुुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
एका खासगी बसवर क्लिनरचे काम करणारा नामदेव हा कोपरी परिसरात वास्तव्याला असून भुवनेश्वर मंदिराच्या परिसरात राहणाºया या पिडीत मुलीवर २२ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास लैंगिक अत्याचार करण्याच्या तयारीत होता. त्याने तिचा विनयभंग केला त्याचवेळी तिच्या चुलत्याच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी धावत जाऊन तिला बाजूला करुन त्याला पकडले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. कहर म्हणजे या प्रकाराने त्याने संतप्त होत मुलीच्या चुलत्यालाच शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. शिवाय, पोलिसांमध्ये तक्रार केली तर पेट्रोल टाकून ठार मारण्याचीही त्याने धमकी दिली. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राम गोपाळ यांच्या पथकाने त्याला पहाटेच्या सुमारास अटक केली.