विवाहितेचा विनयभंग, मानसिक छळ : सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 03:01 IST2017-09-08T03:01:06+5:302017-09-08T03:01:43+5:30
ठाण्यातील एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाºया सांगली जिल्ह्यातील कुटुंबाविरुद्ध वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.

विवाहितेचा विनयभंग, मानसिक छळ : सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा
ठाणे : ठाण्यातील एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करणा-या सांगली जिल्ह्यातील कुटुंबाविरुद्ध वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.
समतानगरातील ओमसाई श्रद्धा सोसायटीत राहणाºया मुलीचा विवाह सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील धोत्रेवाडी येथील उदयसिंग पांडुरंग जाधव यांच्याशी झाला. तीन वर्षांपासून पतीसह सासरची मंडळी शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप तिने वर्तकनगर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. लग्नात मिळालेले संसारोपयोगी साहित्य आणि दागिने असा ३ लाख ८५ हजार ९०० रुपयांचा ऐवज सासरच्या मंडळींनी तिच्याकडून घेतला. शिवीगाळ करून, अपशब्द वापरून तिला माहेरी जाण्यास आरोपींनी प्रवृत्त केले. विवाहितेने वेळोवेळी सासरी जाऊन राहण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपींनी तिला परत जाण्यास प्रवृत्त केले. या तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला.