शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

मोदक व सामग्री ही महागली, यंदा असंख्या व्हरायटीज

By admin | Updated: September 16, 2015 11:50 IST

मोदकांमध्ये प्रामुख्याने वापरण्यात येणाऱ्या तांदळाचे पीठ, नारळ, गूळ, वेलची आदी पदार्थाचे दर वाढल्याने यंदा मोदक ही महागले आहेत. या किंमती मागील वर्षीच्या तुलनेत एका नगामागे सहा

- जान्हवी मोर्ये, भाग्यश्री प्रधान, ठाणेमोदकांमध्ये प्रामुख्याने वापरण्यात येणाऱ्या तांदळाचे पीठ, नारळ, गूळ, वेलची आदी पदार्थाचे दर वाढल्याने यंदा मोदक ही महागले आहेत. या किंमती मागील वर्षीच्या तुलनेत एका नगामागे सहा ते सात रूपयांनी वधारले आहेत. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत मोदकांचे बुकींग कमी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. तसेच नामांकित मिठाई विकेत्यांकडे माव्याबरोबरच अनेक प्रकारचे मोदक विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.चार्तुमासापासून नारळाचे दर शिगेला पोहोचले आहेत. दिवसागणिक त्यात वाढ झाली असून आज नारळाचे दर आकारानुसार २० रूपयांपासून ते ५० रूपयांपर्यत आहेत. सणांमुळे नारळाची वाढती मागणी आणि वाहतूक खर्च महागल्याने नारळ भाव वाढले आहेत.मोदकांसाठी वापरण्यात येणारे सुवासिक बासमती पीठ हे बासमती तांदळांच्या कणीपासून बनविले जातात. ही कणी ४६ रूपये किलोने बाजारात मिळते. त्यामुळे ६० ते ८० रूपये किलो पीठ उपलब्ध आहे. गूळ ५६ रूपये किलो, रवा ४० रूपये किलो , साखर ३२ रू पये, साजूक तूप ४०० रूपये किलो, वेलची १६ रू. तोळा, खसखस १४ रूपये तोळा या दराने उपलब्ध आहेत. याचाच परिणाम बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांवर झाला आहे. १४ रूपयांना मिळणारा उकडीचा एक मोदक यंदा १८ ते २० रूपयांला मिळत आहे. तळलेले मोदक पाव किलो ६० ते ७० रूपयांना आहे. गणेशोत्सवात उकडीचे व तळलेले मोदकांना जास्त मागणी असते. गणेश चतुर्थीला बाप्पाला कोकणात उकडीच्या मोदकांचा नैवेद्य तर खान्देशात तळलेले मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. त्यातही खवा, पुरण, कलाकंद, नारळाचा हलवा असे विविध सारण वापरले जाते.(अधिक वृत्त पान २ वर )- नारळाचे दर आकारानुसार २० रूपयांपासून ते ५० रूपयांपर्यत - १४ रूपयांना मिळणारा उकडीचा एक मोदक यंदा १८ ते २० रूपयांला- तळलेले मोदक पाव किलो ६० ते ७० रूपयांना