रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचा मोबाईल हिसकावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 01:34 IST2021-08-14T01:32:33+5:302021-08-14T01:34:24+5:30

मुंबई- नाशिक पूर्व द्रूतगती मार्गावरुन रिक्षाने जाणाºया एका ३६ वर्षीय महिलेच्या हातातील एक लाख २० हजारांच्या मोबाईलची मोटारसायकलीवरुन आलेल्या चोरटयाने जबरी चोरी केल्याची घटना बुधवारी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.

The mobile of a woman traveling in a rickshaw was snatched | रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचा मोबाईल हिसकावला

रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचा मोबाईल हिसकावला

ठळक मुद्देमुंबई- नाशिक मार्गावरील घटनाराबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुंबई- नाशिक पूर्व द्रूतगती मार्गावरुन रिक्षाने जाणाºया एका ३६ वर्षीय महिलेच्या हातातील एक लाख २० हजारांच्या मोबाईलची मोटारसायकलीवरुन आलेल्या चोरटयाने जबरी चोरी केल्याची घटना बुधवारी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरटयांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा गुरुवारी दाखल झाला आहे.
माजीवडा, ऋतू पार्क येथे राहणारी ही महिला ११ आॅगस्ट रोजी तिच्या मैत्रिणीसमवेत रिक्षाने अंधेरी येथून ठाण्याकडे येत होती. ती रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयासमोरील रस्त्याने माजीवडा ब्रिजच्या जवळ पोहोचली. त्याचवेळी तिच्या रिक्षाच्या डाव्या बाजूनने मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने तिच्या हातातील मोबाईलची जबरीने चोरी करुन पलायन केले. पोलीस उपनिरीक्षक पाटील हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title: The mobile of a woman traveling in a rickshaw was snatched