अंबरनाथमध्ये मोबाईल टॉवरच्या यंत्रणेला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 14:09 IST2021-07-03T14:09:06+5:302021-07-03T14:09:24+5:30
मोबाईल टॉवरसाठी टेरेस वर उभारण्यात आलेली विद्युत यंत्रणा आणि जनरेटरने पेट घेतल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अंबरनाथमध्ये मोबाईल टॉवरच्या यंत्रणेला आग
अंबरनाथ: शिवाजीनगर परिसरात एका रहिवासी इमारतीच्या टेरेसवर असलेल्या मोबाईल टॉवरच्या यंत्रणेला भीषण आग लागली. या आगीच्या घटनेनंतर संपूर्ण इमारत नागरिकांनी रिकामी केले.
मोबाईल टॉवरसाठी टेरेस वर उभारण्यात आलेली विद्युत यंत्रणा आणि जनरेटरने पेट घेतल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मोबाईल टॉवरच्या यंत्रणेला लागलेला आगीमुळे संपूर्ण इमारतीला धोका निर्माण झाला होता. अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करून ही आग आटोक्यात आणण्यात आली.