ठाण्यात मोबाइलची जबरी चोरी करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 23:56 IST2020-09-25T23:49:28+5:302020-09-25T23:56:46+5:30

मोबाइलची जबरी चोरी करुन मोटारसायकलवरुन पळणारा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यानंतर मोटारसायकलसह त्याची ओळख पटल्यानंतर राबोडी पोलिसांनी विकी जॉन पटेकर या मोबाइल चोरटयाला अवघ्या काही तासांमध्येच अटक केली.

Mobile phone robber arrested in Thane | ठाण्यात मोबाइलची जबरी चोरी करणाऱ्यास अटक

सीसीटीव्हीमध्ये कैद झाली चोरी

ठळक मुद्दे सीसीटीव्हीमध्ये कैद झाली चोरीराबोडी पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मोबाइलची जबरी चोरी करणा-या विकी जॉन पटेकर (३२) याला राबोडी पोलिसांनी मोठया शिताफीने अवघ्या २४ तासांमध्ये अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील मोबाइल आणि रोकडही जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोलबाड येथील रहिवाशी दिलीप माळी हे फुुलविक्रेते २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वृंदावन येथून कोलबाडकडे जात होते. ते आंबेघोसाळे तलाव परिसरातून जात असतांना काही चोरटयांनी त्यांच्या मोबाइलची जबरी चोरी करुन तिथून पलायन केले. याप्रकरणी माळी यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये संशयिताचे वर्णन आणि परिसरातील सीसीटीव्हीतील चित्रणाच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पोलीस नाईक केशव धापशी, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत खडसरे आणि वाहिद तडवी आदींच्या पथकाने विकी पटेकर याला २२ सप्टेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून मोबाइल आणि चोरीतील रोकडसह पाकिट असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कथित आरोपी पटेकर याला २ आॅक्टोंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण हे करीत आहेत.

Web Title: Mobile phone robber arrested in Thane