शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधील घाण व दुर्गंधीबाबत मनसे उपाध्यक्ष राजेश कदम यांचे केडीएमसीला खरमरीत पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 12:15 PM

मनसे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केडीएमसी आयुक्त, महापौर आणि सफाई कर्मचाऱ्यांना उद्देशून खरमरीत पत्र लिहिले आहे.

डोंबिवली -  ''महापौर व आयुक्त तसेच सर्व संबंधित पालिका अधिकारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका  येत्या २४ तासात जर सावळाराम महाराज क्रीडा संकुल साफ करून दिले नाही तर त्यातील पसरलेला कचरा/कुसलेले अन्न पदार्थ मा.आयुक्त व मा.महापौरांना "सप्रेम भेट" म्हणून पाठविले जातील'', अशा आशयाचे खरमरीत पत्र मनसे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केडीएमसी आयुक्त, महापौर आणि सफाई कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिले आहे.

ते पुढे म्हणतात की, रोज रडे त्याला कोण रडे ह्या उक्ती प्रमाणे कडोंमपाकडे कितीही तक्रारी करा,आंदोलने करा तरीसुद्धा पुन्हा तिच परिस्थिती येरे माझ्या मागल्या. डोंबिवली क्रिडा संकुल मैदान हे एकमेव मैदान खेळाडूंना खेळण्यासाठी, जेष्ठ नागरिक व सकाळ संध्याकाळच्या वॉकसाठी उपयोगी मैदान आहे, हजारो नागरिक त्याचा वापर करत असतात, त्यातच उत्सव प्रिय डोंबिवलीतील सध्या सर्व महत्त्वाची मोठी मैदाने चालण्या, खेळण्यास बंद आहेत, त्यामुळे डोंबिवली क्रीडा संकुलात मोठी गर्दी असते, परंतु दोन दिवसांपूर्वीच पार पडलेल्या कार्यकर्माचा कचरा-अन्नपदार्थ सर्व मैदानभर पसरले आहे त्यामुळे त्याची दुर्गंधी पसरली आहे व्यायामाला, फिरायला व खेळायला येणाऱ्या नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

दर वेळेला महापालिकेला अधिकाऱ्यांना मैदानावरील कार्यक्रमानंतरच्या त्रासाबाबत लक्ष घालून कायम स्वरूपी तोडगा काढण्याबाबत सुचित करून सुद्धा तो त्रास कायमच होऊ लागला आहे, त्यामुळे आता एकच जमाल गोटा देण्याची वेळ निष्काळजी महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींना देण्यासाठी त्यांचे प्रमुख आयुक्त व महापौर यांना क्रिडा संकुलातील पसरलेल्या कचरा व नासके अन्न पदार्थ येत्या २४ तासात सफाई केले नाही तर तो कचरा व नासके कुजके अन्न पदार्थ "सप्रेम भेट" म्हणून पाठविले जातील ह्याची नोंद घ्यावी असे त्यांनी पत्रात म्हटले. सोशल मीडियावर ते पत्र कदम यांनी पाठवले असून त्याची काही ग्रुपवर चर्चा सुरू आहे. कार्यक्रमांसाठी उपलब्ध करताना इतर खासगी मैदाने पैसे घेऊन कशी स्वच्छ, सुंदर ठेवली जातात त्याचा नगरसेवक व पालिका अधिकारी ह्यांनी अभ्यास वर्ग त्या त्या खासगी मैदाने संस्था चालकांकडून करून घ्यावा हिी विनंती, करदात्या मागरीकांचे तेवढे भले होईल, असेही कदम म्हणाले.

 

टॅग्स :MNSमनसेkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका