राज्य शासनाचा निषेघ करीत हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश मनसेने फाडला
By सुरेश लोखंडे | Updated: April 18, 2025 18:04 IST2025-04-18T18:03:27+5:302025-04-18T18:04:03+5:30
राज्य शासनाने शाळांमध्ये पहिली पासून तर पाचवी पर्यंत हिंदी भाषा सक्तीची केली आहे.

राज्य शासनाचा निषेघ करीत हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश मनसेने फाडला
सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : राज्य सरकारने मराठी शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा सक्तीची, असा आध्यादेश जारी केलेला आहे. त्याविराेधात येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी आक्रमक हाेत हा अध्यादेश ठाण्यातील शासकीय विश्नामगृहासमोर फाडून राज्य सरकारचा शुक्रवारी निषेध व्यक्त केला.
राज्य शासनाने शाळांमध्ये पहिली पासून तर पाचवी पर्यंत हिंदी भाषा सक्तीची केली आहे. त्यामुळे आक्रमक धाेरण स्विकारात शुक्रवारी मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेनीकांनी ठाणे विश्रामगृहसमाेर तीव्र आंदोलन करून राज्य शासनाचा अध्यादेश फाडून निषेध व्यक्त केला आहे. यावेळी राज्य शासनाने जो अध्यादेश काढला आहे तो मनसेनिकांनी फाडला. यावेळी पोलिसांना मनसैनिकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. यास अनुसरून मोरे म्हणाले की इतर राज्यांमध्ये त्यांचीच राज्यभाषा ही महत्त्वाची मानले जाते.परंतु आमच्या राज्यांमध्ये हिंदी भाषेला प्राधान्य का द्यावे. आम्ही राज्य शासनाने लादलेली ही सक्ती कधीच मान्य करणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नेहमी मराठी भाषा आणि माणसाच्या पाठीशी असल्याचे माेरे यांनी स्पष्ट केले