शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

राज यांची पाठ फिरताच पुन्हा टोल वसुली सुरू; मुलुंड चेकनाका येथे वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2024 11:48 AM

मुलुंड चेक नाका येथे वाहतूक कोंडी.

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शुक्रवारी नाशिक दौरा आटोपून मुंबईकडे परत जात असताना त्यांच्या वाहनांचा ताफा मुलुंड चेक नाका येथील वाहतूक कोंडीत सापडला. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. राज यांचा ताफा टोल नाक्यावरून पुढे जाईपर्यंत मुंबईकडे जाणारी आणि ठाण्याकडे येणारी वाहने टोल कर्मचाऱ्यांनी टोल न घेता सोडली. मात्र, त्यांची पाठ फिरताच पुन्हा टोल वसुली सुरू झाली.

■ ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात राज ठाकरे यांनी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि साडेसातच्या सुमारास ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यांच्या वाहनांचा ताफा मुलुंड येथील टोल नाक्याजवळ वाहतूक कोंडीत अडकला. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असतानाही टोल नाक्यावरील कर्मचारी टोल वसुली करीत होते. यामुळे संतप्त झालेले राज गाडीतून उतरून टोल नाक्यावर गेले. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असताना टोल कसले वसूल करता, अशा शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यामुळे टोल कर्मचाऱ्यांनी दोन्ही बाजूंची वाहने टोल न घेता काही मिनिटे सोडली. मात्र, राज यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना होताच पुन्हा टोल वसुली व रांगा लागल्याचे चित्र टोलनाक्यावर दिसले.

राज ठाकरे मागील दोन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर होते. दौरा आटोपून शुक्रवारी ते मुंबईला परतत होते. यावेळी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात थांबले होते.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेmulund-acमुलुंडtollplazaटोलनाका