शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 06:24 IST

आगामी निवडणुकांमध्ये एकत्र सामोरे जाणे आणि ठाणेकर नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आवाज उठविण्याच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीतील रणनीतीसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून महायुतीविरोधात एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी  आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची शनिवारी रात्री बैठक पार पडली. यावेळी काँग्रेस, उद्धवसेना, मनसेचे नेतेही उपस्थित होते. आगामी निवडणुकांमध्ये एकत्र सामोरे जाणे आणि ठाणेकर नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आवाज उठविण्याच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाली.

 विविध समस्यांवर एकत्रित आवाज उठवून आंदोलन करण्याचा सूर यावेळी पदाधिकाऱ्यांनी लावला. वाढती वाहतूक समस्या, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न, पाणीटंचाई, बेकायदा बांधकामे, मेट्रो प्रकल्पातील विलंब, भ्रष्टाचार आदी प्रश्नांवर विरोधी पक्षांनी एकत्रित येत  मोर्चा काढण्याबाबत चर्चा झाली.

जागावाटपाचा निर्णय सर्वात शेवटीबैठकीत जागावाटपात चर्चा झाली नाही. जागावाटप निवडणुका जाहीर झाल्यावरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चारही पक्षांची आज महापालिकेवर धडक काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले, ‘आगामी पालिका निवडणुका एकत्रित लढण्याबाबत चर्चा झाली. महापालिकेतील भ्रष्टाचारासह ठाणेकरांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत चारही पक्षांनी एकत्रितपणे आवाज उठविण्याचे ठरले आहे.’ निवडणुकीची रणनीतीसह ठाण्यात मनसेला सोबत घेऊन लढणार असल्याचीही माहिती एका नेत्याने दिली. पालिकेतील भ्रष्टाचाराबाबत सोमवारी पहिली धडक पालिकेवर दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : MNS likely to join MVA? Hints from Thane meeting.

Web Summary : Maha Vikas Aghadi prepares for Thane municipal elections, signaling unity against Mahayuti. Leaders from Congress, Shiv Sena (UBT), and MNS discussed joint strategies to address Thane's issues like traffic, water scarcity, and corruption. Seat sharing will be decided later. A joint protest at the municipal corporation is planned.
टॅग्स :MNSमनसेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड