शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 07:16 IST

काही विधानसभा मतदारसंघांत संधी असूनही मनसेने शिंदेसेनेविरुद्ध उमेदवार दिले नसल्याचे मत राजकीय निरीक्षकांमध्ये व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील जवळीक गेल्या काही महिन्यांत वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळेच की काय कोपरी-पाचपाखाडी, अंबरनाथ, कल्याण (पूर्व) अशा काही विधानसभा मतदारसंघांत संधी असूनही मनसेने शिंदेसेनेविरुद्ध उमेदवार दिले नसल्याचे मत राजकीय निरीक्षकांमध्ये व्यक्त होत आहे. डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविरोधातही उमेदवार दिलेला नसल्यामुळे महायुतीचे नेते व मनसे यांच्यात छुपी युती झाल्याची चर्चाही येथे सुरू आहे.

कोपरी-पाचपाखाडी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांनी विक्रमी मताधिक्याने निवडून येण्याकरिता मनसेने या ठिकाणी उमेदवार न दिल्याची चर्चा आहे.

ओवळा माजीवडा

ओवळा माजीवडा हा शिंदेसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांचा गड मानला जातो. मागील निवडणुकीत ते जास्त मताधिक्याने निवडून आले होते. येथे यंदा मनसेने दिलेला उमेदवार तुल्यबळ नसल्याचे बोलले जाते आहे. मात्र, हा उमेदवार उद्धवसेनेला मारक असल्याची चर्चा आहे.

अंबरनाथ

अंबरनाथमध्ये शिंदेसेनेचे विद्यमान आ. बालाजी किणीकर यांना पक्षांतर्गत विरोधकांनी घेरले आहे. किणीकर यांची डोकेदुखी वाढू नये याकरिता मनसेने येथे उमेदवार दिलेला नाही, असे बोलले जाते. या मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या जास्त आहे. मनसेने इथे उमेदवार दिला तर मराठी मते विभागली जातील व त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

कल्याण

कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे उमेदवार आ. राजू पाटील यांच्या विरोधात शिंदेसेनेने अद्याप उमेदवार दिलेला नाही. लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना या विधानसभा मतदारसंघातून सर्वांत जास्त मते मिळाली होती. त्यामुळे शिंदेसेनेने ही भूमिका घेतल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

डोंबिवली

आ. राजू पाटील आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांची मैत्री असल्याने डोंबिवली मतदारसंघात मनसेने उमेदवार दिलेला नाही. मनसेने इथे उमेदवार दिल्यास त्याचा थेट फायदा उद्धवसेनेला होण्याची शक्यता आहे. कल्याण (पूर्व) विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिंदेसेना हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मंत्री चव्हाण यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला असून त्यांच्या विनंतीवरून मनसेने उमेदवार न दिल्याची जोरदार चर्चा आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024MNSमनसेMahayutiमहायुती